आल्याचा चहा जास्त पित असाल तर सावधान, या समस्यांचा होऊ शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:13 IST2022-09-28T10:12:52+5:302022-09-28T10:13:17+5:30
Ginger Side Effects: तुम्ही अनेकदा आल्याच्या फायद्यांबाबत तर ऐकलं असेलच, पण आज आम्ही तुम्हाला याच्या नुकसानाबाबत सांगणार आहोत.

आल्याचा चहा जास्त पित असाल तर सावधान, या समस्यांचा होऊ शकतो धोका
Ginger Side Effects: बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी आल्याचा चहा घेण्याची सवय असते. या लोकांना आल्याशिवाय चहा आवडत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ज्या आल्यामुळे चहाचे टेस्ट येते, ते आलं तुमच्यासाठी नुकसानकारही ठरू शकतं. तुम्ही अनेकदा आल्याच्या फायद्यांबाबत तर ऐकलं असेलच, पण आज आम्ही तुम्हाला याच्या नुकसानाबाबत सांगणार आहोत.
छातीत जळजळ
जर तुम्ही कमी प्रमाणात आल्याचं सेवन केलं तर याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण जर तुम्ही टेस्टच्या नादात याचं जास्त सेवन केलं तर याने तुमच्या छातीत जळजळ, पोट खराब होणे इत्यादी समस्या होऊ शकतात.
ब्लीडिंग
आल्याचं सेवन हिवाळ्यात जास्त प्रमाणात केलं जातं. कारण ते गरम असतं. यात अॅंटी-प्लेटलेट्स असतात. आल्यातील हे तत्व ब्लीडिंगचं कारणही ठरू शकतं. त्याशिवाय अनेक लोक आलं काळे मिरे, लवंगसारख्या मसाल्यासोबतही खातात. अशात याचा धोका आणखी वाढतो.
डायरिया
आल्याचं जास्त सेवन केल्याने तुमच्या आतड्यांना इजा होते. तसेच यामुळे डायरिया होण्याचा धोका जास्त असतो. आल्याच्या सेवनाने गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजारही होऊ शकतो.
पोट खराब होणे
आल्याचं सेवन कमी प्रमाणात केलं तरच याचा फायदा होतो. तेव्हाच याने पचनाची शक्ती वाढते. पण जर प्रमाण जास्त झालं तर याने पचन बिघडू शकतं. याच्या जास्त सेवनाने पोटासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.