'या' व्यक्तींसाठी कोरफड म्हणजे विष, अजिबात सेवन करु नका अन्यथा द्याल मृत्यूला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 01:31 PM2021-10-15T13:31:57+5:302021-10-15T13:36:07+5:30

कोणत्याची वस्तुचा अति वापर हा नेहमीच धोकादायक असतो, तसेच काही गोष्टी या औषध असल्या तरी त्या ठरावीक लोकांसाठी किंवा रोगांवरती विषाचे काम करतात. तसेच कोरफडीचे देखील आहे. तर कोणत्या लोकांनी कोरफडचे सेवन करु नये आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

side effects of elovera, pregnant woman, heart patient, kidney patient should not eat elovera | 'या' व्यक्तींसाठी कोरफड म्हणजे विष, अजिबात सेवन करु नका अन्यथा द्याल मृत्यूला आमंत्रण

'या' व्यक्तींसाठी कोरफड म्हणजे विष, अजिबात सेवन करु नका अन्यथा द्याल मृत्यूला आमंत्रण

googlenewsNext

सौंदर्यप्रसाधनांपासून ते आरोग्यापर्यंतच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो. कोरफड हे एक चांगलं आयुर्वेदिक औषध आहे. परंतु कधीकधी त्याचा जास्त वापर केल्याने अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. कोणत्याची वस्तुचा अति वापर हा नेहमीच धोकादायक असतो, तसेच काही गोष्टी या औषध असल्या तरी त्या ठरावीक लोकांसाठी किंवा रोगांवरती विषाचे काम करतात. तसेच कोरफडीचे देखील आहे. तर कोणत्या लोकांनी कोरफडचे सेवन करु नये आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर एखादी स्त्री गर्भवती असेल, तर तिने याचे सेवन टाळावे. कारण कोरफडाने गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे गर्भपात आणि जन्म दोष यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल, तर कोरफड खाण्यापूर्वी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचा जास्त वापर किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. १२ वर्षांखालील मुलांना देखील कोरफड देऊ नये. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल, तर कोरफडीचे सेवन टाळा. यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.

हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचे सेवन करावे. कधीकधी याचा जास्त वापर केल्याने शरीरात एड्रेनालाईन हार्मोन जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात, अशा स्थितीत हृदयाचे ठोके अनियमित होण्याची समस्या उद्भवू शकते.

Web Title: side effects of elovera, pregnant woman, heart patient, kidney patient should not eat elovera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.