शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:41 AM

नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत.

(Image Credit : The Cheat Sheet)

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत लोकांना जाणून घ्यायचं असतं. पण काही गोष्टींबाबत नेहमीच शंका असते. अशीच एक शंका अनेकांच्या मनात असते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नाश्ता करण्याआधी एक्सरसाइज करावी का? सामान्यपणे जास्तीत जास्त लोक सकाळी रिकाम्या पोटीच एक्सरसाइज करतात. पण असे लोकही कमी नाहीत, जे नाश्ता केल्यावर एक्सरसाइज करतात.

(Image Credit : OnlyMyHealth)

नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते.

नाश्त्याआधी एक्सरसाइजचे फायदे

रिकाम्या पोटी एक्सरसाइज करण्याचे अनेक फायदे आहेत. बॉथ विश्वविद्यालयात झालेल्या एका शोधानुसार, वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी केली जाणारी एक्सरसाइज जास्त फायदेशीर ठरते. 

(Image Credit : Fitwirr)

तसेही तुम्ही नाश्त्याआधी एक्सरसाइज करता तेव्हा शरीरात जमा अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत मिळते. नाश्त्याआधी एक्सरसाइज केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा किंवा त्रासाचा सामना करावा लागत नाही.

नाश्त्यानंतर एक्सरसाइज करण्याचे फायदे

(Image Credit : Times Now)

जेव्हा आपण नाश्त्यानंतर एक्सरसाइजबाबत सांगतो तेव्हा समोर येतं की,  तुम्हाला कमजोरी जाणवत नाही. जे लोक हार्ड एक्सरसाइज करतात, त्यांना नाश्त्यानंतरच एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यानंतर एक्सरसाइजचे फायदे कमी होतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कधी करावी एक्सरसाइज?

(Image Credit : Bicycling magazine)

नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज कधी करावी? असाही एक प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर अनेकदा लाइफस्टाईलवर अवलंबून असतं. याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, व्यक्तीला ज्यावेळी एक्सरसाइज करणं चांगलं वाटतं, त्यावेळी त्यांनी एक्सरसाइज करावी.  काही लोकांना नाश्ता करण्याआधी एक्सरसाइज करणं जास्त सोपं वाटतं. तर काही लोकांना नाश्त्यानंतर एक्सरसाइजमध्ये जास्त ऊर्जा जाणवते.

या गोष्टींचीही घ्या काळजी

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नाश्ता केल्यानंतर एक्सरसाइज करायची असेल तर नाश्ता हलका करायला हवा. नाश्ता केल्यानंतर कमीत कमी एक तास कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करणे टाळावे. नाश्ता केल्यावरही स्वत:ला हायड्रेट करण्याचं काम करा.

(Image Credit : Movement and Nutrition)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्ता आणि एक्सरसाइजची योग्य पद्धत महत्वाची असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक्सरसाइज आणि नाश्त्याची निवड करावी.

(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील कोणत्याही गोष्टी फॉलो करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स