जेवण केल्यावर आंघोळ केल्यानं काय होतं? तुम्हीही करत असाल तर लगेच वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:54 IST2025-04-24T15:53:39+5:302025-04-24T15:54:50+5:30
Eating Tips : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

जेवण केल्यावर आंघोळ केल्यानं काय होतं? तुम्हीही करत असाल तर लगेच वाचा...
Bath After Meal Side Effects : आयुर्वेद आरोग्य चांगलं ठेवण्याचा खजिना मानलं जातं. कारण यात जीवन कसं जगायचं आणि आरोग्य कसं निरोगी ठेवायचं याबाबत खडान् खडा माहीत दिली गेली आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून भारतात लोक आयुर्वेदातील सल्ले फॉलो करतात. तुम्ही अनेकदा घरातील वृद्धांकडून ऐकलं असेल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं. जर तुम्ही याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल तर मोठी चूक करत आहात.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ही चुकीच्या क्रियांपैकी एक आहे. आयुर्वेदात या सवयीला संधीवात किंवा त्वचा रोग होण्याचं मुख्य कारण म्हटलं आहे.
जेवणानंतर का करू नये आंघोळ?
तज्ज्ञांनी सांगितलं की, रिसर्चनुसार जेवण केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान 2 डिग्रीपर्यंत वाढतं. याने जेवण पचवण्यात मदत होते. जेव्हा पोटात पचनक्रिया सुरू असते तेव्हा ब्लड फ्लो सुद्धा वेगाने होत असतो.
आयर्वेद काय सांगतं?
तज्ज्ञांनी सांगितलं की, आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया हळुवार होते. ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीराला प्रभावीपणे मिळत नाहीत. शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, संधीवातापासून ते त्वचासंबंधी रोग.
तज्ज्ञ सांगतात की आयुर्वेदानुसार, जेवणाआधी आंघोळ केल्याने तुम्ही निरोगी रहाल. तसेच तुम्ही पोटभर आरामात जेवणही करू शकता. डॉ. अपर्णा यांनी सांगितलं की, जड काही जेवल्यानंतर जवळपास 2 ते 3 तासांपर्यंत आंघोळ करू नये. तर ब्रेकफास्टनंतर 1 तासापर्यंत आंघोळ न केल्यानेही तुमचं आरोग्य चांगलं राहतं.