परफेक्ट फिगर आणि अ‍ॅब्ससाठी शिल्पा शेट्टी फॉलो करते 'हा' योगाभ्यास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:32 PM2019-02-27T17:32:39+5:302019-02-27T17:53:22+5:30

वयाच्या 43व्या वर्षीही बॉलिवू़ड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उत्तम फिगर, बॉलिवूडच्या कोणत्याही न्यूकमर अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी पुरेशी आहे.

Shilpa shetty does this yoga asan for perfect figure | परफेक्ट फिगर आणि अ‍ॅब्ससाठी शिल्पा शेट्टी फॉलो करते 'हा' योगाभ्यास!

परफेक्ट फिगर आणि अ‍ॅब्ससाठी शिल्पा शेट्टी फॉलो करते 'हा' योगाभ्यास!

googlenewsNext

वयाच्या 43व्या वर्षीही बॉलिवू़ड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उत्तम फिगर, बॉलिवूडच्या कोणत्याही न्यूकमर अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी पुरेशी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शिल्पाच्या या फिटनेस, फिगर आणि टोन्ड ऐब्सचं गुपित म्हणजे, योगाभ्यास. शिल्पा आपल्या फिटनेससाठी नेहमीच योगाचा आधार घेताना दिसते. आपल्य चाहत्यांना आणि फिटनेस फ्रिक असणाऱ्या लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तिने त्यावर आधारित एक सीडीही रिलिज केली आहे. 

शिल्पाचं डेली वर्कआउट

शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच डेली वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. योगाचं एक आसन जे शिल्पा शेट्टीला खूप आवडतं आणि तेच आसन तिच्या टोन्ड एब्सचं गुपित असल्याचं तिने अनेकदा सांगितलंही आहे. त्याचं नाव आहे,  परिवृत्त पार्श्वकोणासन  ज्याला रिवॉल्ड साइड एन्गल पोज असंही म्हटलं जातं. 

मसल्स मजबूत होण्यास मदत 

शिल्पा सांगतेय की, योगाचं हे आसन केल्यामुळे तुमची छाती आणि पाठीच्या क्वॉड्रिसेप्स मसल्स आणि पायांच्या काल्फ मसल्स मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर हे आसन केल्यामुळे अपचन, बद्धकोष्ट आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. एवढचं नाही तर यामुळे आपलं पोट आणि ओटीपोटाच्या भाग टोन होण्यास मदत होते. ब्रॉन्काइटिस, अस्थमा आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम यांसारख्या आजारांमध्येही योगाच्या या आसनाचा फायदा होतो. 

सर्व प्रकारच्या वेदना दूर होण्यासाठी

तसं पाहायला गेलं तर योगाचं हे आसन अत्यंत चॅलेजिंग आहे. परंतु एकदा तुम्ही हे करण्याची पद्धत लक्षात घेतली तर त्यानंतर शरीराचे सर्व प्रकाकच्या वेदना आणि समस्या दूर होतील. एवढचं नाही तर तुम्हाला शरीरामध्ये ऊर्जा आणि फ्लूएडिटी जाणवेल. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. 

परिवृत्त पार्श्वकोणासन चे फायदे - 

- पचनसंस्थेशी निगडीत समस्या दूर होतील.

- शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी फायदेशीर.

- पाठीच्या मणक्याच्या समस्या दूर होतात. 

- पाय, गुडघे यांच्या आसपासचे स्नायू आणि लिगामेंट्स मजबूत होतात. 

- फुफ्फुसांचा व्यायाम होतो, ज्यामुळे श्वसनाशी निगडीत आजारही दूर होतात.

असं करा परिवृत्त पार्श्वकोणासन?

- खालच्या दिशेला थोडसं वाकून आपल्या उजवा पाय पुढे करा आणि डावा पाय थोडासा मागे ठेवा. 

- दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडा आणि उजव्या बाजूला वळा.

- याच अवस्थेत थांबून आपला डावा हात जमिनीवर उजव्या पायापासून काही अंतरावर ठेवा. 

- श्वास घ्या आणि आपले दोन्ही हात कानांवर आणण्याचा प्रयत्न करा.

- या अवस्थेत थांबा आणि हळूहळू श्वास घ्या.

- तुमच्या शरीराचं संपूर्ण वजन तुमच्या पायांवर किंवा हातांवर येणार नाही, याची काळजी घ्या. 

फिटनेस फ्रिक आहे शिल्पा शेट्टी :

Web Title: Shilpa shetty does this yoga asan for perfect figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.