पावसाळ्यात जलद पसरतो हंगामी ताप, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:00 PM2021-06-22T21:00:03+5:302021-06-22T21:05:43+5:30

पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे यावर काय उपाय करता येईल? कशी काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊया...

Seasonal fever spreads fast in the rainy season, know the symptoms and remedies ... | पावसाळ्यात जलद पसरतो हंगामी ताप, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...

पावसाळ्यात जलद पसरतो हंगामी ताप, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...

Next

पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. जेव्हा शरीर या बदलला प्रतीकूल होतं तेव्हा शरीराला ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. या शिवाय अन्य जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचा सुद्धा धोका असतो. मलेरिया आणि डेंग्यू सारख्या तापाच्या साथीमुळे मृत्यूही होतात. त्यामुळे यावर काय उपाय करता येईल? कशी काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊया...

तापाची लक्षणे
पावसाळ्यात होणाऱ्या तापाची काही खास लक्षणे असतात. आज आम्ही तुम्हाला त्यापैकीच काही ६ लक्षणे सांगणार आहोत. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण आढळले तर तुम्ही आवर्जून उपचार घ्यावेत. श्वास घेण्यात अडचण, नाक बंद होणे, खोकला, अंगदुखी होणे, डोकेदुखी, स्नायुंमध्ये ताण निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ घरगुती उपचार घ्यावे, जर त्रास वाढतच गेला तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


हर्बल टी
हर्बल टीचा उपयोग तुम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी निश्चित करू शकता. यामुळे तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या अॅलर्जीपासूनही वाचू शकता. तुम्ही हर्बल टी मध्ये लवंग, काळी मिरी, तुळशीची पान टाकूनही त्याचे सेवन करू शकता.


योगा
ताप येण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही सेतुबंधासन, कपालभाति प्राणायाम, सर्वांगासन, वीरभद्रासन आणि अनुलोम-विलोम असे व्यायाम करू शकता. यामुळे श्वसन यंत्रणा सुरळीत होते व शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात.

वाफ घेणे
गरम पाण्यात पुदिन्याची पाने आणि ओवा मिश्रण करून त्याची वाफ घ्यावी. ही वाफ खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवून देऊ शकते. याशिवाय पुदिना, ओवा, कापूर, निलगिरी मिक्स करून तयार केलेला आयुर्वेदिक लेप गळ्यातील खसखस, खोकला, जळजळ इत्यादी समस्या दूर करू शकतो. हा लेप सर्दी आणि तापाला सुद्धा दूर ठेवतो. हा लेप गरम पाण्यात मिसळून त्याची वाफ घ्यावी. लक्षात ठेवा पाणी गरम करायचे आहे उकळवायचे नाही आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Seasonal fever spreads fast in the rainy season, know the symptoms and remedies ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app