Lemon For Uric Acid: वैज्ञानिकांचा दावा जॉइंट्समधील यूरिक अॅसिड दूर करतो लिंबाचा रस, असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:47 IST2023-03-22T11:47:16+5:302023-03-22T11:47:52+5:30
High Uric Acid Level : हा एक क्रॉंनिक मेटाबोलिक डिसऑर्डर आहे. ज्यामुळे तुम्हाला गाउट आर्थरायटिस, किडनी स्टोन, हाय ब्लड प्रेशर, किडनी फेलियर आणि इतकंच नाही तर हार्ट डिजीजचा धोका वाढतो.

Lemon For Uric Acid: वैज्ञानिकांचा दावा जॉइंट्समधील यूरिक अॅसिड दूर करतो लिंबाचा रस, असा करा वापर
यूरिक अॅसिड (High Uric Acid Level) ची लेव्हल वाढणं एक गंभीर समस्या आहे ज्याला मेडिकलच्या भाषेत हायपरयुरिसीमिया (Hyperuricemia) म्हटलं जातं. हा एक क्रॉंनिक मेटाबोलिक डिसऑर्डर आहे. ज्यामुळे तुम्हाला गाउट आर्थरायटिस, किडनी स्टोन, हाय ब्लड प्रेशर, किडनी फेलियर आणि इतकंच नाही तर हार्ट डिजीजचा धोका वाढतो.
यूरिक अॅसिड लेव्हल का वाढतं?
हे तुमच्या द्वारे खाल्लं-प्यायलं गेलेल्या प्यूरिन नावाचं तत्व असलेल्या खाद्य-पेय पदार्थांपासून तयार होतं. हे वाढलं तर जॉइंटमध्ये वेदना, सूज आणि आखडलेपणा अशा समस्या जाणवततात. मेडिकलमध्ये यूरिक अॅसिडसाठी उपचार आणि औषधं उपलब्ध आहेत, पण लिंबाच्या माध्यमातूनही तुम्ही हे कमी करू शकता.
sciencedirect वर प्रकाशित एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, लिंबाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. ज्यात किडनी स्टोनचा धोका कमी करणे आणि यूरिक अॅसिड लेव्हल कमी करणे यांचा समावेश आहे.
यूरिक अॅसिड कसं कमी करावं
सायट्रस म्हणजे आंबट फळांचा रस गाउटच्या लक्षणांना कमी करण्यास मदत करतो आणि लिंबू याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. चला जाणून घेऊ लिंबाने कसं यूरिक अॅसिड आणि किडनी स्टोनचा धोका कमी केला जाऊ शकतो. तसेच त्याचा वापर कसा करावा.
किती असावी यूरिक अॅसिड लेव्हल
रक्तात यूरिक अॅसिडची लेव्हल महिलांमध्ये 6 mg/dL आणि पुरुषांमध्ये 6.8 mg/dL पेक्षा जास्त असू नये. यापेक्षा जास्त असेल तर हा हायपरयुरिसीमियाचा संकेत आहे. याची नॉर्मल रेंज 3.5 ते 7.2 mg/dL दरम्यान आहे.
यूरिक अॅसिडचा वैरी आहे लिंबू
वैज्ञानिकांना असं आढळून आलं की, लिंबाच्या रसामुळे रक्तातील यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत मिळते. यूरिक अॅसिडवर लिंबाचा प्रभाव जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी यूरिक अॅसिड असलेल्या उंदरांवर आणि मनुष्यांवर याचा अभ्यास केला. असं समोर आलं की, लिंबाच्या रसामुळे यूरिक अॅसिड कमी झालं.
या अभ्यासादरम्यान वैज्ञानिकांनी उंदीर आणि मनुष्यांना 6 आठवडे रोज 30 मिली ताज्या लिंबाचा रस प्यायला दिला. त्यानंतर समोर आलं की, लिंबाचा रस मनुष्य आणि उंदीर दोघांमधील सीरम यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी करू शकतो.
कसं करावं लिंबाच्या रसाचं सेवन?
वैज्ञानिकांनी आपल्या अभ्यासात सांगितलं की, रोज लोकांनी लिंबाचा रस किंवा लिंबू पाणी प्यावे. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही रोज ताज्या लिंबाचा रस सेवन करू शकता किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. पण याच्या प्रमाणाची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि लिंबू पाण्यात मीठ किंवा साखरेचा वापर करणं टाळलं पाहिजे.