शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

अरे व्वा! हवेतील कोरोनाच्या प्रसाराला रोखता येणार; लसीनंतर रशियानं तयार केलं अनोखं मशिन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 3:02 PM

या मशिनद्वारे काही सेकंदात हवेद्वारे पसरत असलेल्या व्हायरसबाबत माहिती मिळवता येऊ शकते.

कोरोना व्हायरसच्या माहामारीनं जगभरात गेल्या 4 महिन्यांपासून हाहाकार पसरवला आहे.  जगभरातील शास्त्रज्ञांचे कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी संशोधन सुरू आहे. दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्याबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. हवेतील बॅक्टेरिया, विषारी पदार्थ, व्हायरसचा शोध घेणं हे खूप कठीण काम आहे.  आता रशियन तज्ज्ञांनी हवेतील बॅक्टेरिया, व्हायरसला डिटेक्ट करणारं एक मशिन तयार केलं आहे. या मशिनद्वारे काही सेकंदात हवेद्वारे पसरत असलेल्या व्हायरसबाबत माहिती मिळवता येऊ शकते. इतकंच नाही तर या मशीनच्या माध्यमातून व्हायरसच्या  प्रसाराचा स्त्रोतही  कळू शकतो. 

शुक्रवारी मॉस्कोच्या सैन्य औद्योगिक मंच 2020 मध्ये केमिस्ट्री बायो नावाचं उपकरण दाखवण्यात आलं. हे मशिन KMZ फैक्ट्रीद्वारे तयार करण्यात आलं आहे. या मशिनला विकसित करणारे तज्ज्ञ गामालेया इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीचा  भाग आहेत. ज्या कंपनीद्वारे जगातील पहिली कोरोना लस लॉन्च करण्यात आलेली या रशियन कंपनीतील तज्ज्ञ  हे मशिन तयार करत आहेत . डिटेक्टर बायो पॉकेट कोणत्याही  मशिनप्रमाणे दिसत नसून रेफ्रेजरेटर प्रमाणं दिसतं. याचा आकार लेअर केक डिजाईनमध्ये तयार करण्यात आला आहे. या मशिनच्या प्रत्येक लेअरमधून तपासणी केली जाते.

या मल्टीपल लेअर्स मशीनच्या माध्यमातून हवेत प्रसारित होत असलेल्या व्हायरसची माहिती मिळू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य परिणाम दिसून येण्यासाठी दोन टप्प्यातील चाचणी प्रक्रियेतून जावं लागतं.  पहिल्या टप्प्यात आजूबाजूच्या हवेतील नमुने एकत्र केले जातात. 10 ते 15 सेकंदात व्हायरस, बॅक्टेरिया आणि विषारी बॅक्टेरियांना डिटेक्ट केलं जातं. त्यानंतर विस्तृत विश्लेषण केलं जातं. या प्रक्रियेसाठी 2 तासांचा कालावधी लागतो.  हे मशिन जगभरातील गर्दीच्या ठिकाणी वापरात असावं असं तज्ज्ञांचे मत आहे. मेट्रो, रेल्वे स्टेशन, विमानतळं अशा सार्वजनिक ठिकाणी या मशिनचा वापर केला जाऊ शकतो.

दरम्यान  कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात देशात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे पण वाचा-

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या