शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Rules changing from 1st march : कोरोना लसीकरण ते बँकांपर्यंत, उद्यापासून हे नियम बदलणार; सामान्यांवर थेट होणार परिणाम 

By manali.bagul | Updated: February 28, 2021 13:26 IST

Rules changing from 1st march : कोरोना लस मिळण्याचा पुढच्या टप्पा सुरु होणार असून शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील. काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा (Primary School Starts from tomorrow) देखील सुरू होत आहेत.

दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून काही बदल होत असतात. या बदलांचा थेट संबंध सर्व सामान्यांच्या रोजच्या  जगण्यातील महत्वाच्या गोष्टींशी असतो. यावर्षीही उद्यापासून काही (Rules Changing from 1st March 2021)  बदल होणार आहेत. कोरोना लस मिळण्याचा पुढच्या टप्पा सुरु होणार असून शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील. काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा (Primary School Starts from tomorrow) देखील सुरू होत आहेत. उद्यापासून कोणते नवीन नियम लागू होतील याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आजारी, वयस्कर लोकांना मिळणार कोरोनाची लस

आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा १ मार्चपासून लागू होणार आहे. उद्यापासून ६०  वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना आणि ४५  वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. १ मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा (Coronavirus Vaccination Drive) हा पुढचा टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत मिळणार असून खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.

एसबीआयमध्ये केव्हायसी अनिवार्य

उद्यापासून एसबीआय ग्राहकांना केव्हायसी अपडेट करणं अनिवार्य आहे. जे ग्राहक हे केव्हायसी अपडेट करून देणार नाहीत. त्यांना विविध सरकारी योजनांचा किंवा इतर योजनांचा लाभ घेताला समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

LPG गॅस सिलेंडरचे दर

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Gas Cylinder Price) निश्चित करतात. १ मार्च रोजी या किंमतीत बदल होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात एकूण ३ वेळा तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत.

३ राज्यात प्राथमिक शाळा उघडणार

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) १ मार्चपासून उघडणार आहेत. तर हरियाणामध्ये ग्रेड १ आणि २ साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीसाठी शाळा आधीच उघडल्या आहेत. दिलासादायक! आता कोरोनापासून बचाव करणं आणखी सोपं होणार; टॅबलेटमध्ये मिळू शकते लस

बँक ऑफ बडोदामध्ये होणार बदल

विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी (IFSC Code) कोड 1 मार्चपासून निष्क्रिय होईल. या बँकांच्या ग्राहकांना उद्यापासून नवीन IFSC कोड वापरावा लागणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) या दोन्ही बँका विलिन झाल्यामुळे ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. बँकेने याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना दिली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल 2019 पासून लागू झाले आहे. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक आहेत. खुशखबर! जॉनसन एंड जॉनसनच्या 'सिंगल डोस' कोरोना लसीला मंजूरी; ६६ टक्के प्रभावी ठरणार

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMONEYपैसाSchoolशाळाbankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्या