Risk of touching something and catching coronavirus is tiny new research shows | दिलासादायक! सार्वजनिक स्थळी कोणत्याही जागेवर स्पर्श केल्यास पसरणार नाही कोरोना?; संशोधनातून खुलासा

दिलासादायक! सार्वजनिक स्थळी कोणत्याही जागेवर स्पर्श केल्यास पसरणार नाही कोरोना?; संशोधनातून खुलासा

मागच्या वर्षी मार्च, एप्रिलमध्ये कोरोना व्हायरस वेगानं पसरला होता. आतासुद्धा तेच चित्र पाहायला मिळत आहे. कोणत्याही ठिकाणाला स्पर्श केल्यानं कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरू शकतं असा दावा यापूर्वी करण्यात आला होता. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासात  असा दावा करण्यात आला आहे. आता एखाद्या भागाला स्पर्श केल्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि सॅनिटायजेशन बंद करायला हवं, असा अजिबात याचा अर्थ होत नाही.  कोरोनापासून बचावासाठी हा एक योग्य उपाय आहे. 

अमेरिकेत झालेल्या संशोधनानंतर तज्ज्ञांनी दावा केला आहे की, आता कोणत्याही भागाला स्पर्श केल्यानंतर कोरोना व्हायरस परसण्याचा धोका कमी असतो. ती जागा संक्रमित असेल तरिही संक्रमण पसरण्याची तीव्रता जास्त असणार नाही.  सेंटर फॉर  डिजीस कंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही भागाला स्पर्श केल्यानंतर कोरोना संक्रमण झाल्याचं १० हजारातून एक केस पाहायला मिळत आहे. 

सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनासंबंधित गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी एक्सपर्ट्सनी  धोक्याची सुचना दिली होती की,  जे लोक सार्वजिक वाहनांचा वापर करत आहेत.  किंवा सुपरमार्केटमध्ये जात आहेत. त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे. पण आता सर्वच  ठिकाणी योग्य प्रमाणात सॅनिटायजेशन केलं जात आहे. त्यामुळे चिंतेचं काहीही कारण नाही.  आरोग्य तंज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसमुळे होत पसरत असलेला कोविड १९ हवेमार्फत जास्त प्रमाणात पसरत आहे. कारण कोरोना संक्रमित लोकांच्या नाकातोंडातून बाहेर येत असलेल्या  व्हायरसमुळे इतरांपर्यंत संक्रमत पोहोचू शकतं. 

घरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असेल तर कशी घ्याल काळजी?

तज्ज्ञांच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. अशात हॉस्पिटल्समद्य बेडची कमतरता भासत आहे. अनेकांना बेड मिळत नाहीयेत. अशात जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करता येतात. म्हणजे जे जास्ती सीरिअस नाहीत अशा रूग्णांवर. यासाठी घरातील लोकांनी ४ स्टेपचा अवलंब करावा. 

१) सर्वात पहिलं काम हे करा की, जर तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांना लगेच आयसोलेट करा. त्यांना डबल मास्क लावण्यास सांगा आणि स्वत:ही डबल मास्क लावा.

२) कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रूग्णाच्या संपर्कात येत असाल तर घरातही फेस शील्ड वापरा. किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी कामाला जात असाल तर तेव्हाही फेश शील्ड लावून ठेवा.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

३) सोबतच हेही गरजेचं आहे की, रोज दिवसांतून दोन वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुरळा करा. दोन वेळा वाफ घ्या.

जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध! 

४) सोबतच घरात कोरोना रूग्ण असताना रूग्णाने आणि तुम्हीही शू कव्हर घालावे.
या टिप्सने अशा लोकांना फार फायदा होईल जे कोविड-१९ रूग्णांची काळजी घेत आहेत. किंवा जे दुकानदार म्हणून दिवसभर सार्वजनिक रूपाने काम करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Risk of touching something and catching coronavirus is tiny new research shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.