तुम्हीही चुकीच्या पद्धतीने तर खात नाही ना आंबे? आयुर्वेद एक्सपर्टने सांगितली योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 09:13 IST2024-05-15T09:05:22+5:302024-05-15T09:13:02+5:30
Health Tips : आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वारालक्ष्मी यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आंबे खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

तुम्हीही चुकीच्या पद्धतीने तर खात नाही ना आंबे? आयुर्वेद एक्सपर्टने सांगितली योग्य पद्धत!
Health Tips : आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. लहान असो वा मोठे सगळ्यांना आंबा खाणं आवडतं. आंब्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. जे अनेकांना माहीत नसतात. कारण लोक फक्त याच्या टेस्टचा आनंद घेतात. कुणी आंबे कापून खातात तर कुणी यांचा रस करतात. मात्र, आंबे खाण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. बरेच लोक चुकीच्या पद्धतीने आंबे खातात आणि मग त्यांना वेगवेगळ्या समस्या होतात.
अशात आंब्यांचा आनंदही घ्यायचा आहे आणि आरोग्यही चांगलं ठेवायचं असेल तर आंबे खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. अशात आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वारालक्ष्मी यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आंबे खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की, बरेच लोक चुकीच्या पद्धतीने आंबे खातात ज्यामुळे त्यांना याचे फायदे कमी होतात आणि नुकसान जास्त.
पाण्यात ठेवा
जास्तीत जास्त लोक बाजारातून आंबे विकत आणल्यावर ते फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. एक्सपर्टनुसार, आंबे खाण्याआधी कमीत कमी एक तास पाण्यात टाकून ठेवावे. आंबे गरम आणि जड असतात त्यामुळे त्यांना पाण्यात ठेवलं तर त्यांच्या हलकेपणा येतो. तसेच यातील फायटिक अॅसिडही निघून जातं.
वेलची टाका
कापून खाण्यासाठी आंबे कापल्यावर ते तसेच खाऊ नका. यात वेलचीची पूड टाका. ज्या लोकांना आंब्याची एलर्जी आहे किंवा ज्यांना काही समस्या होते त्यांनी वेलची टाकून आंबे खावेत. याने उष्णता कमी होते आणि शरीराला थंड वाटतं.
चमच्याने खाऊ नका
बरेच लोक स्वच्छतेच्या कारणाने किंवा हात चिकट होऊ नये म्हणून आंबे काट्याच्या चमच्याने खातात. पण आंबे नेहमी हाताने खावेत. असं केल्याने आंबे डायजेस्ट करण्यास मदत मिळते. त्यासोबतच आंबे कधीही शेक किंवा रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा कापूनच खावेत. पूर्ण फळ खावं. याने तुम्हाला याचे फायदे जास्त मिळतील.