अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार

By manali.bagul | Published: March 2, 2021 11:29 AM2021-03-02T11:29:14+5:302021-03-02T11:46:39+5:30

CoronaVirus News & Latest Updates : हे एक विषाणूनाशक पेटंट आहे. जे बंद वातानुकुलित वातावरणातील कोरोना व्हायरसला मारून हवेला १०० टक्के शुद्ध बनवते.

RGCB certifies aerolyz as 100 percent safe air sterilizer even eliminating coronavirus genes | अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार

अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार

Next

कोरोना व्हायरसची (CoronaVirus) माहामारी नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान एक वेगळी टेक्नोलॉजी विकसित केली जात आहे. भारतीय वैज्ञानिकांनी  हे खास तंत्र विकसित केलं आहे. यामुळे वातानुकुलित खोलीतील कोरोना व्हायरसला मारून हवा सुरक्षित बनवता येऊ शकते.  केरळमधील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी (RGCB certifies aerolyz ) नं हे खास टेक्नोलॉजी एयरोलाइज बनवलं आहे. हे एक विषाणूनाशक पेटंट आहे. जे बंद वातानुकुलित वातावरणातील कोरोना व्हायरससला मारून हवेला १०० टक्के शुद्ध बनवते.

राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (आरजीसीबी) ही भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागांतर्गत एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने 'एरोलाइज' चे प्रमाणपत्रही दिले आहे. याद्वारे हानिकारक व्हायरस फिल्टर आणि संग्रहित होत नाही, परंतु त्यांना हवेमध्ये मारले जातात. अहवालानुसार या विशिष्ट तंत्रज्ञानाची कार्यक्षमता तपासण्यासाठी इन्फ्लूएंझा ए, २०० H एच 1 एन 1-स्वाइन फ्लू, कोरोना व्हायरस ई जीन्स आणि कोरोना व्हायरस एस जीन्स यामध्ये इंजेक्शन दिले गेले. यानंतर, आरटी-पीसीआर पद्धतीने वेगवेगळ्या वेळी हवेचे नमुने घेऊन या विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्यात हे आढळले की 'एरोलाइज' एएसआर ६०० एरोबोन इन्फ्लूएंझा ए आणि स्वाइन फ्लूसह कोरोना विषाणूच्या १०० टक्के निर्मूलनास प्रभावी आहे.

रिपोर्ट्सनुसार, एरोलाइज हे केरळ स्टार्टअप मिशनमध्ये नोंदणीकृत 'पॅनेज बायोसाइसेस सोल्यूशन लिमिटेड' चे उत्पादन आहे. राज्य उत्पादन विभागातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यात त्याचे उत्पादन होते. राज्य सचिवालयात आरजीसीबीचे संचालक चंद्रभास नारायण, राज्याचे आरोग्यमंत्री के. के. शैलेजा यांनी 'एरोलाइज' चे प्रमाणपत्र दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की हे विशिष्ट तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

आता टॅबलेटमध्ये मिळू शकते कोरोनाची लस

लोकांना लवकरत लवकर कोरोना व्हायरसची  लस टॅबलेटच्या स्वरूपात मिळू शकते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी या संशोधनावर काम सुरू केले आहे. डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड आणि एक्सट्राजेनका लसीच्या मुख्य तज्ज्ञ सारा गिल्बर्ट यांनी आपल्या टीमसह इंजेक्शन फ्री लस देण्याचे काम सुरू केले आहे.

वैज्ञानिकांच्या टीमकडून कोरोना व्हायरसच्या लसीचा शोध सुरू आहे. जी फ्लूच्या आजारासाठी  उपयोगी असलेल्या नेजल स्प्रे प्रमाणे किंवा पोलिओच्या लसीकरणात उपयोगी ठरत असलेल्या टॅबलेटप्रमाणे असेल. ही फक्त इंजेक्शनची धास्ती असलेल्यांसाठी आनंदाची गोष्ट नाही तर संपूर्ण जगभरात लसीकरण अभियानाला यामुळे गती मिळणार आहे. याशिवाय इतर लसींप्रमाणे ठराविक तापमानात स्टोअरही करावं लागणार नाही. काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा 

प्राध्यापक गिल्बर्ट यांनी हाऊस ऑफ कॉमन्स एंण्ड टेक्नोलॉजी कमिटीशी बोलताना सांगितले की, ''टॅबेलट किंवा नेझल स्प्रे फुफ्फुसं गळाआणि नाकाच्या इम्यून सेलवर योग्यपद्धतीनं काम करतील. अनेक लसी अशा आहेत ज्या नेझल स्प्रे च्या स्वरूपात घेतल्या जातात. कोरोना व्हायरसच्या टॅबलेटच्या लसीच्या निर्मीतीसाठी प्रयत्न केले  जात आहेत. नेझल स्प्रे आणि टॅबलेट लस तयार करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.'' चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं

Web Title: RGCB certifies aerolyz as 100 percent safe air sterilizer even eliminating coronavirus genes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.