शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

थंडीत बोट सुजुन सुन्न पडतात? चिंता नको! तज्ज्ञांनी सांगितलेले हे उपाय देतील चटकन आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 4:27 PM

आपल्या सर्वांना माहीत आहे की, सुन्न बोटांनी काम करणं अशक्य होतं. कधीकधी सूज आणि वेदना इतक्या प्रमाणात वाढतात की, ते असह्य होतं. काही दिवस उपचार न करताही आपोआप आराम मिळू लागतो. पण कधी कधी हा त्रास कमी होण्याचं (Winter Health Tips) नाव घेत नाही.

हिवाळ्यात जर तुमची बोटं सुन्न होत असतील किंवा बधीर होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, सुन्न बोटांनी काम करणं अशक्य होतं. कधीकधी सूज आणि वेदना इतक्या प्रमाणात वाढतात की, ते असह्य होतं. काही दिवस उपचार न करताही आपोआप आराम मिळू लागतो. पण कधी कधी हा त्रास कमी होण्याचं (Winter Health Tips) नाव घेत नाही.

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यामध्ये बोटं सुन्न होण्याची आणि बोटांना सूज येऊन एकाच जागी रक्तसंचय होण्याची समस्या वाढते. यामुळं वेदना किंवा मुंग्या येणं आदी समस्या उद्भवतात. हिवाळ्यात या समस्येचं मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणं आणि शरीराच्या अवयवांपर्यंत कमी ऑक्सिजन पोहोचणं. त्यामुळं बोटं सुन्न होऊ (winter Fingers care) लागतात. त्याची लक्षणं आणि ही समस्या टाळण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊ.

बोटं सुन्न होण्याची लक्षणं

  • वेदना आणि स्पर्श किंवा काहीही समजण्यात अडचण
  • बोटाला नेहमी सूज येत राहणं.
  • बोटं हलवण्यात अडचण.

बोट सुन्न होण्याची कारणं आणि उपायथंडीमुळं बोटं सुन्न किंवा बधीर होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

१. कोरफड (aloe vera)सर्वप्रथम, ताजा कोरफडीचा गर घ्यावा आणि तो सुन्न झालेल्या बोटावर लावावा. अर्धा तास तसंच राहू द्यावं. यामुळं सूज कमी होईल.

२. अ‌ॅपल सायडर व्हिनेगरएक चमचा पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून कापसाच्या मदतीनं बोटाला लावा. याच्यामुळं खूप चांगला परिणाम मिळेल.

३. हळदहळदीमध्ये पाण्याचं काही थेंब मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट सुन्न झालेल्या बोटावर लावा. यामुळं सूज आली असल्यास ती कमी होईल आणि वेदनाही थांबतील.

४. एप्सम सॉल्टएका भांड्यात गरम पाणी घ्या. त्या पाण्यात एक चमचा एप्सम सॉल्ट घाला आणि चांगलं मिसळा. ज्या बोटात वेदना होत असतील ते बोट बुडवून त्यात अर्धा तास तसंच राहू द्या. तुम्हाला आराम मिळेल.

बोटं सुन्न होणं अशा प्रकारे टाळता येईलबोटं सुन्न होऊ नयेत किंवा बधीर होऊ नयेत, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी खाली काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

  • बोटं सुन्न झाली असतील किंवा थोडी दुखत असतील तर, त्या बोटांना पूर्ण विश्रांती द्यावी.
  • इजा होऊ शकेल अशा क्रियाकलापांपासून दूर रहा.
  • तुमची बोटं बरी होत असल्यास बोटांचा व्यायाम करा
  • याशिवाय, इतर काही आजार नाही ना, याची तपासणी करून डॉक्टरांचं मत घेणंही खूप महत्त्वाचं आहे.
  • कोणतंही वजन उचलताना बोटांवर जास्त जोर देऊ नका.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स