विकी-कतरिनाच्या लग्नात मागवण्यात आली लाल केळी, काय आहे या केळ्यांचे महत्त्व? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:15 PM2021-12-08T14:15:45+5:302021-12-08T14:24:01+5:30

कतरिना-विकीच्या लग्नासाठी कर्नाटक आणि थायलंडमधून भाज्या मागवण्यात आल्या आहेत. कर्नाटकमधून खास लाल केळीही (Red banana) मागवण्यात आली आहेत. लाल केळी इतकी खास का आहेत आणि इतर केळ्यांपेक्षा ती कशी वेगळी आहेत, हे जाणून घेऊया.

red bananas from Karnataka have ordered for Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding | विकी-कतरिनाच्या लग्नात मागवण्यात आली लाल केळी, काय आहे या केळ्यांचे महत्त्व? घ्या जाणून

विकी-कतरिनाच्या लग्नात मागवण्यात आली लाल केळी, काय आहे या केळ्यांचे महत्त्व? घ्या जाणून

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचं लग्न (Katrina Kaif Vicky Kaushal wedding) हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे. या लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी बातमी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील चौथ बरवाडा येथे असलेल्या सिक्स सेन्सेस फोर्ट या आलिशान हॉटेलमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या शाही लग्नातील फूड मेन्यूसुद्धा (Katrina Kaif-Vicky Kaushal's Wedding Food Menu) चर्चेत आहे.

कतरिना-विकीच्या लग्नासाठी कर्नाटक आणि थायलंडमधून भाज्या मागवण्यात आल्या आहेत. कर्नाटकमधून खास लाल केळीही (Red banana) मागवण्यात आली आहेत. तब्बल १५० किलो लाल केळी मागवण्यात आली आहेत. या केळ्यांचा दर ३५० रुपये डझन एवढा आहे. जगभरात केळ्यांचे १ हजाराहून अधिक प्रकार आढळतात. लाल केळी प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळतात. लाल केळ्यांची चव इतर केळ्यांपेक्षा वेगळी असते. डेझर्टसाठीही लाल केळ्यांचा वापर केला जातो. लाल केळी इतकी खास का आहेत आणि इतर केळ्यांपेक्षा ती कशी वेगळी आहेत, हे जाणून घेऊया.

लाल आणि पिवळ्या केळ्यांमधला फरक पाहायचा झाल्यास, लाल केळी पिवळ्या केळ्यांपेक्षा कमी गोड असतात. तसंच लाल केळी आकाराने थोडी लहान असली, तरी घट्ट असतात. पिवळ्या केळ्यांच्या तुलनेत लाल केळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. म्हणजे, पिवळ्या केळ्यांपेक्षा लाल केळी आरोग्यासाठी जास्त चांगली असतात.

पोटाच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक घटक या केळ्यांतून मिळतात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लाल केळ्यांमध्ये फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि बी-6 हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. 100 ग्रॅम लाल केळ्यांपासून 90 कॅलरीज मिळतात. लाल केळ्यांमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

कतरिना आणि विकी (Vicky-Katrina Wedding ) यांचा विवाह ९ डिसेंबरला होणार असून, ७ तारखेपासूनच वेगवेगळे विधी सुरू झाले आहेत. कतरिना आणि विकीचं लग्न २०२१ मधलं सर्वांत मोठं लग्न मानलं जात आहे. या विवाहसोहळ्याबाबत गुप्तता पाळली जात असून, हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

Web Title: red bananas from Karnataka have ordered for Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.