रात्री झोपेत तुम्हालाही घाम येतो का? 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 10:48 IST2024-11-29T10:47:47+5:302024-11-29T10:48:15+5:30
हार्मोनल बदल किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. अशात रात्री झोपेत घाम येण्याची कारणे आणि त्यावर काही घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रात्री झोपेत तुम्हालाही घाम येतो का? 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत!
Sweating at night : बऱ्याच लोकांना रात्री झोपेत घाम येतो. काहींना तर इतका घाम येतो की, कपडेही भिजतात आणि झोपमोडही होते. जर तुम्हालाही असं होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे हार्मोनल बदल किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. अशात रात्री झोपेत घाम येण्याची कारणे आणि त्यावर काही घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रात्री झोपेत घाम का येतो?
- पहिलं कारण हृदयरोग असू शकतं. त्याशिवाय कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही याचं कारण असू शकतो. जसे की, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, कार्सिनॉइड ट्यूमर आणि ल्यूकेमिया.
- तसेच रात्री झोपेत घाम येणे हा लो ब्लड शुगरचाही संकेत असू शकतो. त्याशिवाय रात्री घाम येणं शरीराचं तापमान वाढण्याचं लक्षण असू शकतं.
- महिलांमध्ये मेनोपॉज दरम्यान होणाऱ्या शारीरिक बदलांमुळेही रात्री झोपेत घाम येऊ शकतो. थायरॉईड हेही याचं एक कारण असू शकतं.
- प्रेग्नेन्सी दरम्यान हार्मोनचं प्रमाण कमी-जास्त होत असल्यानेही रात्री घाम येऊ शकतो.
काही घरगुती उपाय
- जर रात्री तुम्हाला घाम येत असेल तर रात्री भरपूर थंड पाणी प्यावे.
- झोपण्याआधी सैल आणि सुती कपडे घाला. जेणेकरून घाम कमी येईल.
- रात्री येणारा घाम टाळण्यासाठी दिवसा भरपूर चालावं. सायकलिंग किंवा स्वीमिंगही करू शकता.
- रूममधील खिडक्या उघड्या ठेवा. त्याशिवाय सिगारेट पिणं टाळा आणि झोपण्याआधी व्यायाम करा.