...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:20 AM2019-11-18T11:20:23+5:302019-11-18T11:27:21+5:30

आठवड्यातील ४ दिवस काम करण्याच्या फायद्यांबाबत अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमधे येत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत मागणीही केली आहे.

The reason why employees are not getting 4 day work week | ...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट

...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट

Next

आठवड्यातील ४ दिवस काम करण्याच्या फायद्यांबाबत अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमधे येत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत मागणीही केली आहे. बिझनेस आणि सरकार अनेक दशकांपासून यावर प्रयोगही करत आहेत. तसं बघायला गेलं तर जगभरात ४ डे वर्कवीकबाबत जवळपास गेल्या ५० वर्षांपासून चर्चा होत आहे. पण मग अडचण काय आहे?

गेल्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्ट जपानचा एक रिपोर्ट समोर आला होता. यात सांगण्यात आले की, ४ वर्किंग डे च्या ट्रायलमधून प्रॉडक्टिविटीमधे ४० टक्के वाढ बघायला मिळाली. त्यानंतर या मुद्द्यावर भरभरून स्टोरीज प्रकाशित झाल्या. 

(Image Credit : workskills.org.au)

वॉर्टन स्कूल ऑफ बिझनेसचे ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजीस्ट अ‍ॅडम ग्रांट सांगतात की, अमेरिकेत येणाऱ्या काळातही  मला असं काही होतांना दिसत नाही. ग्रांट यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बिझनेस लीडर्सकडे यावर्षी कामाचे दिवस कमी करण्याची मागणी केली होती.

(Image Credit : mirror.co.uk)

त्यांनीच सांगितले की, कंपन्या ४ दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग करण्याबाबत तीन कारणांमुळे घाबरत आहेत. एक तर त्यांचा इंटरेस्ट नाहीये, दुसरं त्यांचा कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही आणि तिसरं म्हणजे त्यांना याच्या फायद्याची समज नाही. 

ते म्हणाले की, 'आणखी चांगला रिसर्च करूनच यासाठी लोकांना तयार केलं जाऊ शकतं. मला चांगला आणि अधिक डेटा बघायचा आहे. सध्या आमच्याकडे मोजकीच उदाहरणे आहेत. ही उदाहरणे परस्परविरोधीही असू शकतात. काही केसेसमध्ये ४० तास ४ दिवसात विभागले जाऊ शकतात. तर दुसऱ्या केसेसमध्ये आठवड्यातून थेट एक दिवस कमी केला जाऊ शकतो.

कामाच्या दिवसाबाबत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होत राहिले आहेत. ज्यातून कॉर्पोरेटमधे करण्यात आलेले प्रयोग सर्वात सकारात्मक राहिले. गेल्यावर्षी न्यूझीलॅंड स्टेट प्लानिंग अ‍ॅडव्हायजरी फर्मने २४० कर्मचाऱ्यांसोबत ४ दिवसांच्या आठवड्याचं ट्रायल केलं आणि यातून त्यांना कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स वाढलेलं दिसलं. प्रयोग इतका यशस्वी होता की, कंपनीने नेहमीसाठी हा बदल केला.

केवळ कर्मचाऱ्यांच्या फायद्यासोबतच परपेचुअल गार्जिअनच्या ट्रायलमधे आणि मायक्रोसॉफ्ट जपानच्या ट्रायलमधे कंपन्यांचा फायदा म्हणजेच प्रॉडक्टिविटीवर फोकस केलं गेलं. तसेच कर्मचाऱ्यांनाही लहान आठवडा हवा आहेच.


Web Title: The reason why employees are not getting 4 day work week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.