प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:07 IST2025-10-14T17:06:24+5:302025-10-14T17:07:42+5:30
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे.

प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
Premanand Maharaj Health: प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराजांच्या दोन्ही किडन्या खराब असल्यामुळे, त्यांच्यावर सतत उपचार सुरू असतात. मात्र, काही दिवसांपासून त्यांची तब्येत जास्त बिघडल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्याच्या कारणास्तव महाराजांनी भक्तांना भेटणे कमी केले आहे. शिवाय, त्यांची दैनंदीन तीर्थयात्राही अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे.
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांना पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Polycystic Kidney Disease - PKD) नावाचा आजार झाला आहे. हा किडनीशी संबंधित सर्वात गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. प्रेमानंद महाराजांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना दररोज डायलिसिस करावे लागते. 2006 मध्ये पहिल्यांदा या आजाराचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना झालेला पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (PKD) हा अनुवांशिक (Genetic) विकार आहे.
या आजारात किडनीमध्ये पाण्याने भरलेले सिस्ट (गाठ) तयार होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, किडनीचे फिल्टरेशन कमी होते आणि शेवटी किडनी फेल्युअर होण्याचा धोका निर्माण होतो. अशा रुग्णांना पुढे जाऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते.
या आजाराचे दोन प्रकार असतात
1- ADPKD (Adult Polycystic Kidney Disease) - प्रामुख्याने प्रौढ व्यक्तींमध्ये आढळतो.
2- ARPKD (Autosomal Recessive PKD) - दुर्मिळ असून मुलांमध्ये दिसतो.
यात किडनीचा आकार हळूहळू वाढत जातो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे, लघवीत रक्त येणे, वारंवार लघवीची इन्फेक्शन आणि सतत उच्च रक्तदाब अशी लक्षणे दिसतात.
या आजारामुळे मृत्यू होऊ शकतो का?
वैद्यकीय संशोधनानुसार, ADPKD रुग्णांचा मृत्यूदर सामान्य लोकांपेक्षा 1.6 ते 3.2 पट जास्त असतो. PubMed मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, किडनी फेल्युअरपूर्व अवस्थेत मृत्यूदर सुमारे 18.4 प्रति 1000 रुग्ण/वर्ष असतो आणि जेव्हा आजार ESRD (End-Stage Renal Disease) म्हणजेच पूर्ण किडनी फेल्युअरच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा तो दर 37.4 प्रति 1000 रुग्ण/वर्ष इतका वाढतो.
US National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases (NIDDK) च्या मते, जर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर PKD मुळे अखेर किडनी फेल्युअर होते आणि मृत्यूचा धोका प्रचंड वाढतो.
प्रतिबंध आणि उपाय
या आजाराचे पूर्ण उपचार सध्या उपलब्ध नाहीत, पण लवकर निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते. किडनी अल्ट्रासाउंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा प्रसवपूर्व तपासणीद्वारे हे ओळखता येते. वेळेत निदान आणि योग्य आहार, औषधोपचार, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने किडनीचे कार्य दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.