पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 11:43 IST2019-11-20T11:34:32+5:302019-11-20T11:43:16+5:30
महिलांना मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी तुमचे पती, मित्र किंवा मित्रांना तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जसे मूड स्विंग होतात तसे होताना पाहिलेत का?

पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत!
(Image Credit : rebelcircus.com)
महिलांना मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी तुमचे पती, मित्र किंवा मित्रांना तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जसे मूड स्विंग होतात तसे होताना पाहिलेत का? तुम्ही जर कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नसेल तर नक्की द्या आणि जर कधी लक्ष दिलं असेलच तर याची कारणे जाणून घ्या.
हे पीरियड्स नाहीत
जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही तुम्हाला पुरूषांना होणाऱ्या एखाद्या सीक्रेट पीरियड्सबाबत सांगत आहोत. तर तुम्ही चुकताय. कारण पीरिड्सदरम्यान होणाऱ्या त्रासांचा अनुभव पुरूषांना कधीच आलेला नसतो.
याला म्हणतात PMS
पुरूषांमध्ये PMS म्हणजे प्रीमेन्ट्रुअल सिम्प्टम्ससारखे बदल होण्याचं एक कारण असतं. हा एक खासप्रकारचा सिंड्रोम आहे. ज्याला मेन्स सिंड्रोम असंही म्हटलं जातं. हा एक इरिटेबल मेल सिंड्रोम असतो. ज्यात पुरूषांना तसेच मूड स्विंग्स होतात, जसे महिलांना पीरियड्सदरम्यान होतात. यादरम्यान पुरूषही मूडी होतात.
IMS
(Image Credit : thetimes.co.uk)
IMS म्हणजेच ‘Irritable Male Syndrome’. यालाच हायपर सेन्सिटीव्हसारखं मानलं जातं. या स्थितीत पुरूषांच्या व्यवहारात काही प्रमाणात तणाव, चिंता, चिडचिडपणा दिसतो. आणि या सगळ्यांचं मुख्य कारण असतं बायोकेमिकल बदल.
पुरूषांना येतो 'हा' अनुभव
‘Irritable Male Syndrome’ स्थितीत पुरूषांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यांच्यावर तणाव वरचढ ठरतो आणि त्यांच्या बोलण्यासोबतच व्यवहारातूनही स्वत:च्या इमेजबाबत चिंता दिसून येते. हे सगळं मूड स्विंगमुळे होतं.
IMS चं कारण
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, IMS ही एक भितीयुक्त व्यवहाराची स्थिती आहे. ज्यात व्यक्तीला स्वत:लाच समजत नाही की, त्याच्यासोबत काय होत आहे. त्यांना इरिटेबल, थकवा आणि डिप्रेशनचा अनुभव येतो. याचं मुख्य कारण मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन असतं.
काय करावं?
जर तुम्हाला वाटतं की, तुमचे पती, बॉयफ्रेन्ड किंवा मित्राचा मूड सतत बदलत असतो, तेव्हा त्यांना आणखी त्रास देण्याऐवजी त्यांच्याशी बोला आणि त्यांना समजून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की हे स्थिती जास्त वाईट आहे. अशात तुम्ही डॉक्टरांची हेल्प घेऊ शकता. तुम्ही त्यांना आवडते पदार्थ खायला देऊ शकता, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता आणि त्यांना स्पेशल फील देऊ शकता.