High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी करू नये दुर्लक्ष, डोळ्यांचं होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:30 IST2022-07-07T13:30:43+5:302022-07-07T13:30:54+5:30
High Blood Pressure: ब्लड प्रेशर वाढल्याने रेटिनाच्या ब्लड वेसल्स डॅमेज होऊ शकतात. बीपी वाढल्याने डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ बीपी वाढल्याने डोळ्यांना काय काय समस्या होतात.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी करू नये दुर्लक्ष, डोळ्यांचं होऊ शकतं मोठं नुकसान
High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर दिसून येतो. हार्ट आणि किडनीवरही याचा परिणाम होतो. पण अनेकांना माहीत नाही की, हाय बीपीचा वाईट परिणाम डोळ्यांवरही होतो. ब्लड प्रेशर वाढल्याने रेटिनाच्या ब्लड वेसल्स डॅमेज होऊ शकतात. बीपी वाढल्याने डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ बीपी वाढल्याने डोळ्यांना काय काय समस्या होतात.
डोळ्यांची दृष्टी कमी होणं
हायपरटेंशनमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते. बीपी वाढल्याने मेंदूवर प्रेशर वाढतो. ज्यामुळे नसांवर दबाव वाढू लागतो. हे प्रेशर इतकं जास्त असतं की, डोळ्यांच्या पडद्यावर कोणत्याही प्रकारची कोणती आकृती बनत नाही आणि रूग्णाला काहीच दिसत नाही. ज्या रूग्णांचा बीपी जास्त असतो त्यांनी नियमितपणे त्यांच्या डोळ्यांची टेस्ट करावी.
हाइपरटेंसिव रेटिनोपॅथी
हायपरटेंशन रेटिनोपॅथीची समस्या त्या लोकांना होते ज्यांना हायपरटेंशनची समस्या असते. या आजारात रक्ताच्या धमण्या डॅमेज होतात, ज्यामुळे रेटिनामध्ये सूज येते आणि डोळ्यात रक्ताच्या शिरा वाढतात. ज्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होतो.
डोळ्यात ब्लड स्पॉट
डोळ्यात ब्लड स्पॉट होण्याचं कारणही हाय बीपीची समस्या असू शकते. ही समस्या वयोवृद्धांमध्ये जास्त बघायला मिळते. याला सब्सकंडक्टिवल हॅमरेज या नावानेही ओळखलं जातं. ही समस्या हाय बीपीचा संकेत असू शकते. याला शुगर लेव्हल वाढणे आणि हायपरटेंशनची समस्या याचं कॉमन लक्षण मानलं जातं.