पोटावरील चरबी काही दिवसात पपईने करता येईल कमी, जाणून घ्या कशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 10:04 AM2019-11-16T10:04:14+5:302019-11-16T10:04:21+5:30

बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतीही वगैरे नाही. पण काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्यांचा आहारात समावेश करून काही दिवसात तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

Papaya is best and beneficial for belly fat weight loss | पोटावरील चरबी काही दिवसात पपईने करता येईल कमी, जाणून घ्या कशी!

पोटावरील चरबी काही दिवसात पपईने करता येईल कमी, जाणून घ्या कशी!

googlenewsNext

बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतीही वगैरे नाही. पण काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्यांचा आहारात समावेश करून काही दिवसात तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. यात अधिक फायदेशीर ठरणारं फळ म्हणजे पपई. पपईमधे अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि भरपूर कॅलरी असतात. तसेच पपईमधे आढळणारे इंजाइम्सने केवळ वजनच कमी होत नाही तर बॅड कोलेस्ट्रॉलही केमी केलं जातं. चला जाणून घेऊ पपईने पोटावरील चरबी कशी कमी करता येऊ शकते. 

वजनही होईल कमी आणि पोषणाची कमतरता होणार नाही

वजन कमी करण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की, वजन कमी अशाप्रकारे कमी करावं ज्याने शरीरात पोषण कमी होणार नाही. पपईमधे फार जास्त गुण असतात. त्यामुळे याच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता आणि तसेच याने शरीराला इतरही अनेक फायदे होतात. अनेक आजारांपासूनही तुम्हाला सुरक्षा मिळते. 

पपईच्या बीया आहेत फायदेशीर

(Image Credit : geniusupdates.com)

वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असतात पपईच्या बीया. पपई शरीराची पचनक्रिया योग्यप्रकारे काम करण्यासाठी योग्य प्रमाणात फायबर देते. पपईच्या काळ्या रंगांच्या बीया शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात. 

योग्य अंतराने खावे

(Image Credit : steptohealth.com)

जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पपईचा आधार घ्यायचा असेल तर गरजेचं आहे की, पपई योग्य अंतराने खावी. असं करणं त्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं जे लोक डिटॉक्सिफिकेशन आणि फॅट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ब्रेकफास्टला पपई

(Image Credit : timesofindia.indiatimes.com)

सकाळी किंग साइज नाश्ता केल्यावर हे निश्चित आहे की, तुम्हाला दुपारच्या जेवणाआधी भूक लागणार नाही. जर तुम्ही सकाळचा नाश्ता हेल्दी करायचा असेल तर तुम्ही एक ग्लास दूध आणि पपई खाऊ शकता.

लंचमधे पपईचा ज्यूस

(Image Credit : completewellbeing.com)

लंचसाठी तुम्ही वेगवेगळी कडधान्ये किंवा उकडलेल्या भाज्या खाऊ शकता. त्यासोबतच तुम्ही एक ग्लास पपईचा ज्यूसही सेवन करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही पपईची स्मूदी सुद्धा तयार करू शकता.

रात्रीच्या जेवणावेळ

सामान्यपणे रात्री कमी किंवा हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रात्री सूप पिणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. त्यासोबतच रात्री आहारात पपईचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं.


Web Title: Papaya is best and beneficial for belly fat weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.