शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ऑर्थोपेडिक विकारांवर शस्त्रक्रिया न करता उपचार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 1:56 AM

नवीन उपचारपद्धतींमध्ये चुंबकीय अनुनाद (मॅग्नेटिक रेझोनन्स) पद्धती ही एक फिजिओथेरपीशी संबंधित नॉन-इन्व्हेसिव उपचारपद्धती आहे.

- डॉ. प्रदीप महाजननवीन उपचारपद्धतींमध्ये चुंबकीय अनुनाद (मॅग्नेटिक रेझोनन्स) पद्धती ही एक फिजिओथेरपीशी संबंधित नॉन-इन्व्हेसिव उपचारपद्धती आहे. हळूहळू फार्माकॉॅलॉजिकल उपचारपद्धतीची जागा घेण्याची क्षमता या उपचारपद्धतीमध्ये आहे. आण्विक चुंबकीय अनुनाद उपचारांचे पेटंट ब्रॅण्ड एमबीएसटीखाली घेण्यात आलेले आहे. ही निदानशास्त्रात वापरली जाणारी सर्वज्ञात पद्धती आहे. अलीकडेच ऑर्थोपेडिक विकारांमध्ये या उपचारपद्धतीच्या उपयुक्तततेची पडताळणी करण्यात आली.एमबीएसटीचा वापर केला असता कूर्चा (कार्टिलेज) पुन्हा तयार होऊ शकतो व हाडांच्या घडणीला चालना मिळते असे दिसून आले आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांमध्ये ही उपचारपद्धती वरदानासारखी ठरू शकेल. या विकारात हाडांमधील क्षारांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) कमी झाल्यामुळे सतत फ्रॅक्चर होण्याचा मोठा धोका असतो. ड जीवनसत्त्वाची पूरके व व्यायामासोबत हे उपचार घेतले असता, ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांमधील बीएमडीच्या प्रमाणात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.डिजनरेटिव्ह, ह्युमॅटिक विकारांमध्येही एमबीएसटीमुळे वेदनांपासून तत्काळ आराम मिळतो. याशिवाय खेळताना झालेल्या दुखापतींनाही (स्पोर्ट्स इंज्युरीज) याचा खूप फायदा होतो. मानवी शरीरातील उतींच्या चयापचयावर विद्युत व चुंबकीय क्षेत्रांचे नियंत्रण असते या तत्त्वावर एमबीएसटी आधारलेली आहे. शरीर निरोगी असते तेव्हा पेशी व उतींच्या पुनर्निर्मितीवर ते स्वत: सूचना देऊन नियंत्रण ठेवते. मात्र, उतींना हानी पोहोचल्यास (कुर्चा किंवा हाडांमध्ये) सूचना देण्याच्या यंत्रणेत हस्तक्षेप सुरू होतो. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी वेदना होतात आणि सांध्यांची हालचाल करण्यात अडचणी येतात. रुग्णाला दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते. एमबीएसटीचे उद्दिष्ट आहे हानी पोहोचलेल्या भागातील सूचनांची दिशा बदलून व्यवस्था पुन्हा सामान्य व निरोगी स्थितीत आणणे. ही उपचारपद्धती शरीरातील पेशींना उत्तेजित करते आणि कूर्चा, अस्थिबंध व अन्य उतींची पुनर्निर्मिती पुन्हा सुरू करते. त्यामुळे वेदना कमी होतात आणि सांध्यांची हालचाल सोपी होते.एमबीएसटीच्या कृतीची प्रस्तावित यंत्रणा म्हणजे ध्वनीलहरींचा वापर करून हायड्रोजन प्रोटॉन्सना उत्तेजन देणे. त्यामुळे शरीरात उच्च ऊर्जेची स्थिती निर्माण होते. मग ही ऊर्जा एमआरआयमध्ये सोडली जाते त्याच पद्धतीने मुक्त केली आहे आणि आसपासच्या उती ती शोषून घेतात. उतींनी ऊर्जा शोषून घेतली की पेशींच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. एमबीएसटीमुळे पुढील विकारांपासून आराम मिळतो: ह्युमॅटॉइड संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, क्रीडांगणावर होणाऱ्या दुखापती, पाठीचा कणा/मणक्यातील डिजनरेटिव्ह विकार आणि असे अनेक.एमबीएसटीचा प्रमुख फायदा म्हणजे ही उपचारपद्धती पेशींच्या स्तरावर काम करते; म्हणूनच ती विकाराच्या मूळ कारणाचे (पॅथोलॉजी) निराकरण करते आणि शरीरावर प्रभावी, दीर्घकाळ टिकणारे व सकारात्मक परिणाम देते. स्नायूंच्या दुखापतीपूर्वीच्या अवस्थेत घेऊन जाण्यास स्मरणशक्तीला मदत मिळावी यासाठी फिजिओथेरपी सुरू ठेवणे अपरिहार्य आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स