खुल्या जागेत या व्यायामाशिवाय जेवण केले तर ते सुद्धा अधिक लाभदायक ठरते.
खुले वातावरण जेवणासाठी हितकारक
/>मनाला शांती व उत्साह वाढविण्यासाठी खुल्या जागेत भटकंती केली जाते; परंतु अशा खुल्या जागेत या व्यायामाशिवाय जेवण केले तर ते सुद्धा अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे अन्नही जादा सेवन करता येते. हा निष्कर्ष अमेरिकेत एका अभ्यासक्रमातून समोर आला आहे. नोत्रदाम विद्यापीठातील सहप्राध्यापक कीम रोलिंग्ज व कोर्नेल या विद्यापीठातील ५७ विद्यार्थ्यांनी हा अभ्यास केला आहे. याकरिता त्यांनी किचनमधील पडदे तसेच अडथळे उभे करून, प्रयोग केला. त्यामधून खुल्या वातावरणात जेवण अधिक लाभदायक ठरते असा निष्कर्ष निघाला. खुले वातावरण व अधिक प्रकाश असणाºया ठिकाणी जेवण हे अधिक जात असल्याचे रोलिंग्ज यांनी सांगितले. खुल्या ठिकाणी जेवल्यास स्वयंपाकघरातील जेवणापेक्षा १७० कॅलरी अधिक मिळत असल्याचेही समोर आले. त्याकरिता घरासोबतच शाळा, महाविद्यालये व कामाच्या ठिकाणी जेवणाची रचना ही मोकळ्या जागेत करणे आवश्यक आहे; परंतु अन्न अधिक घेतल्याने वजन वाढण्याचा धोकाही असल्याचे रोलिंग्ज म्हणाल्या. त्याकरिता काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे किचनची रचना मोकळ्या जागेत करणे आवश्यक आहे.
Web Title: Open environment is beneficial for dinner