शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

Omicron Symptoms : घशात खवखव, सर्दी-खोकला किंवा ओमायक्रॉनची लागण? जाणून घ्या कधी करावी टेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:47 IST

Omicron Symptoms : अनेकांना प्रश्न पडला आहे की, ओमायक्रॉनचं एकही लक्षण दिसलं तरी कोविड टेस्ट करावी का? यावर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत.

भारतात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) केसेस सतत वाढतच आहेत. याच्या लक्षणांबाबत चिंताही वाढत आहे. घशात खवखव, खोकला-सर्दी नसताना घशात खवखव, नाक वाहणं किंवा नाक बंद होणं यासारखी लक्षणं ओमायक्रॉनची सुरूवातीची लक्षणं आहेत. यातील एक लक्षण दिसलं तरी अनेक लोक विचार करत आहेत की, त्यांना ओमायक्रॉनचं संक्रमण होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांनी टेस्ट करायला हवी. पण केवळ एक लक्षण दिसल्याने हे समजणं की, तुम्हाला ओमायक्रॉनचं संक्रमण आहे, तज्ज्ञांनुसार हे चुकीचं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भायखळा मुंबईच्या मासीना हॉस्पिटलचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशिअन, एमडी चेस्ट अ‍ॅन्ड ट्यूबरकुलोसिस, डॉ. सुलेमान लधानी सांगतात की, 'आम्हाला आढळलं की, घशात खवखव होणं ओमायक्रॉनच्या लक्षणांपैकी एक आहे. पण केवळ घशात खवखव असणं याचा अर्थ हा नाही की, तुम्ही ओमायक्रॉनने संक्रमित आहात'.

ते पुढे म्हणाले की, 'पण, जर तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात आले असाल जे प्रवास करून आले आहेत किंवा जर तुम्हाला घशात खवखव सोबतच नाक वाहणं, ताप किंवा अंगदुखी असेल तर तुम्ही कोविडची टेस्ट नक्की करावी. केवळ घशात खवखव असणं म्हणजे तुम्हाला ओमायक्रॉनची लागण झाली असं होत नाही. हे केवळ वातावरणामुळेही होऊ शकतं. याला घाबरण्याची गरज नाही'.

WHO चे दक्षिण-पूर्व आशिया भागातील निर्देशक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी ओमायक्रॉनबाबत सांगितलं की, आतापर्यंत आम्हाला जे माहीत आहे, ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये याच्या रूग्णांची वाढ होत आहे.

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, ज्या लोकांची काहीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. ते सुद्धा ओमायक्रॉनने संक्रमित होत आहेत. याचा अर्थ असा होतो की, ओमायक्रॉन हळूहळू कम्युनिटी स्प्रेड होत आहे. हेही म्हटलं जाऊ शकतं की, ज्या लोकांना कोविड वॅक्सीनचे दोन डोज घेतले आहेत, त्यांना हलक्या स्वरूपाचं संक्रमण होत आहे.

हैद्राबादच्या यशोदा हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटरवेंशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. गोपी कृष्ण येदलपती म्हणाले की, 'ओमायक्रॉनच्या संबंधित संक्रमण फार हलकं असतं. यात घशाची समस्या, भूक न लागणे आणि जरा कमजोरी वाटणे यांचा समावेश आहे'.

ते पुढे म्हणाले की, 'राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनच्या जास्तीत जास्त केसेसमध्ये खोकला, सर्दी, धाप लागणे, गंध आणि चव कमी असे पारंपारिक लक्षणं बघितले गेले नाहीत. अशात जर तुमची काही ट्रॅव्हल हिस्ट्री नसेल किंवा तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात आले नाहीत जे प्रवास करून आले आहेत किंवा तुम्हाला घशात खवखव वा अंगदुखी सारखे सामान्य लक्षण असेल तर तुम्ही अनावश्यक टेस्ट टाळली पाहिजे'.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स