शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Omicron Symptoms : डोळ्यात दिसत असतील ही ७ लक्षणं तर असू शकतात ओमायक्रॉनचे संकेत, करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:04 PM

Omicron Symptoms : नव्या व्हेरिएंटच्या संक्रमितांमध्ये खोकला ते डायरियासारखीही लक्षणं दिसत आहेत. पण अनेकदा डोळ्यांशी संबंधित समस्याही ट्रिगर करू शकतो.

ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत (Omicron Symptoms) रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता काही डॉक्टर्स म्हणाले की, कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंटचं पहिलं लक्षण रूग्णाच्या डोळ्यात दिसणं सुरू होऊ शकतं. नव्या व्हेरिएंटच्या संक्रमितांमध्ये खोकला ते डायरियासारखीही लक्षणं दिसत आहेत. पण अनेकदा डोळ्यांशी संबंधित समस्याही ट्रिगर करू शकतो.

WHO ने डोळ्यांशी संबंधि समस्येला असामान्य किंवा कमी दिसणाऱ्या लक्षणांच्या रूपात सूचीबद्ध केलं आहे. यात डोळ्यांशी संबंधित एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणांचा सहभाग असू शकतो. रिपोर्टनुसार, डोळ्यात गुलाबीपणा किंवा डोळ्यांचा पांढरा भाग किंवा पापण्यांवर सूज येणे ओमायक्रॉन इंन्फेक्शनचं लक्षण असू शकतं.

त्यासोबतच डोळे लालसर होणे, जळजळ वाटणे आणि वेदना होणे हेही नव्या व्हेरिएंटच्या संक्रमणाची निशाणी आहे. डोळ्यांना धुसर दिसणं, लाइट सेन्सिटिविटी किंवा डोळ्यातून सतत पाणी येणं याचं लक्षण असू शकतात. जून २०२० मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या रूग्णांमध्ये ५ टक्के डोळ्यांशी संबंधित समस्या कंजेक्टिवायटिसचे शिकार होऊ शकते.

केवळ डोळ्यांशी संबंधित लक्षण दिसणे याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला ओमायक्रॉनचं संक्रमण आहे. अनेकदा डोळ्यांशी संबंधित समस्या दुसऱ्या कारणांमुळेही होऊ शकते. त्यामुळे कोविडच्या इतर लक्षणांवर नजर टाका.

काय सांगतो रिसर्च?

भारतीय वैज्ञानिकांनी कोरोनात डोळ्यांशी संबंधित लक्षणांना दुर्मीळ मानलं आहे. ते म्हणाले की,  हे एखादी व्यक्ती संक्रमित असल्याचं सुरूवातीचं लक्षण असू शकतं आणि याला एक प्राथमिक इशाराही समजला जाऊ शकतो. काही रिसर्चने डोळ्यांशी संबंधित लक्षणांची व्यापकता अधिक वाढवली आहे. एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, ३५.८ टक्के हेल्दी लोकांच्या तुलनेत ४४ टक्के कोविडचे रूग्ण डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करतात. यात डोळ्यातून पाणी वाहणं आणि लाइट सेन्सिटिविटिसाऱखी लक्षणं सर्वात कॉमन आहेत.

डोळ्यात कसा प्रवेश करतो व्हायरस?

'गोल्डन आय'या जर्नलमध्ये डॉ. निसा असलम म्हणाल्या की कोविड व्हेरिएंट ज्या सेल रिसेप्टर्सने शरीरात दाखल होतो. ते डोळ्यात असतात. व्हायरस या रिसेप्टर्सना दगा देऊन शरीरात प्रवेश करतात. हे रिसेप्टर्स डोळ्यांच्या अनेक भागात आढळतात. काही रिसर्चच्या सुरूवातीच्या निष्कर्षांमध्ये सांगण्यात आलं आहे की, डेल्टा आणि बीटाच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये या रिसेप्टर्ससोबत जुळण्याची जास्त क्षमता आहे. जर असं असेल तर मग डोळ्यांशी संबंधित लक्षणं ओमायक्रॉन संक्रमणाचे संकेत असू शकतात. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना