कोविड-१९ (Covid-19) च्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) वेगाने पसरत आहे. पण वेगवेगळ्या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी आहे. पण तरीही ओमायक्रॉनपासून बचाव करण्यातच हुशारी आहे. कारण हा डेल्टापेक्षा ४ पटीने अधिक वेगाने पसरत आहे ओमायक्रॉनची लक्षणं सर्दीच्या मिळती जुळती आहेत. सुरूवातीच्या रिसर्चवरून समजलं आहे की, हा व्हेरिएंट हलका आहे. पण ताप, घशात खवखव, अंगदुखी, रात्री घाम येणे, उलटी आणि भूक न लागणे ही लक्षणं ओमायक्रॉनचे संकेत असू शकतात.
वेगवेगळ्या रिसर्चच्या आधारावर ओमायक्रॉनची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. यातील २ लक्षणं अशी आहेत जी जास्तीत जास्त लोकांमध्ये बघायला मिळत आहेत.
या लक्षणांपासून रहा सावध
'द सन'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनच्या दोन मुख्य लक्षणांमध्ये नाक वाहणं आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. ही दोन लक्षणं ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये सर्वात जास्त दिसून येत आहेत. यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये महामारी विज्ञान आणि आरोग्य सूचना विज्ञानाचे प्राध्यापक आयरीन पीटरसन यांच्यानुसार, नाक सतत वाहणं आमि डोकेदुखी अनेक संक्रमणाची लक्षणं आहेत. पण हे कोविड १९ किंवा ओमायक्रॉनची लक्षणंही असू शकतात. जर तुम्हाला ही दोन लक्षणं दिसत असतील तर कोविड टेस्ट करून घ्या.
तेच काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वात आधी शोधणारे डॉ एंजेकिल कोएत्जी म्हणाले होते की, जे ओमायक्रॉनने संक्रमित आहेत, त्यांना गंधाची कमी किंवा टेस्ट जाणवत नाही. त्यासोबतच ओमायक्रॉन संक्रमित रूग्णांमध्ये नाक बंद होणे किंवा खूप जास्त ताप येणे अशा केसेस समोर आल्या नाहीत. जे डेल्टाचे प्रमुख लक्षण होते. त्यामुळे ओमायक्रॉन आणि डेल्टा यांच्यात एक मोठं अंतर असू शकतं.
ओमायक्रॉनची २० लक्षणं (Top 20 Omicron symptoms)
१) शिंका येणे
२) नाक वाहणे
३) सतत खोकला
४) डोकेदुखी
५) घशात खवखव
६) थकवा
७) कर्कश आवाज
८) थंडी वाजणे
९) ब्रेन फॉग
१०) चक्कर येणे
११) ताप
१२) गंध बदलणे
१३) डोळे दुखणे
१४) छाती दुखणे
१५) भूक न लागणे
१६) टेस्ट बदलणे
१७) मांसपेशींमध्ये वेदना
१८) ग्रंथींमध्ये सूज येणे
१९) कमजोरी
२०) स्कीनवर रॅशेज