Diabetes tips: डायबिटीस रुग्णांनो शुगर कंट्रोल करायचीय? मग 'या' फळाच्या पानांचा काढा प्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:41 IST2022-04-03T17:37:21+5:302022-04-03T17:41:10+5:30
ऑलिव्ह पानांच्या काढ्याचे नियमित सेवन केले तर (Drink Olive Leaves Kadha To Control Blood Sugar) त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

Diabetes tips: डायबिटीस रुग्णांनो शुगर कंट्रोल करायचीय? मग 'या' फळाच्या पानांचा काढा प्या
आजाराचे रुग्ण शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करत असतात. वास्तविक, मधुमेह हा आजार रक्तातील साखर अनियंत्रित होणे आणि इन्सुलिन हार्मोन स्वादुपिंडातून बाहेर न पडल्यामुळे होतो. खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा, व्यायामाचा अभाव आणि वाईट जीवनशैलीमुळं ही समस्या उद्भवू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्ही देखील मधुमेहाचा सामना करत असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही साखर नियंत्रित करू शकता. यापैकी एक उपाय म्हणजे ऑलिव्हच्या पानांपासून (Blood Sugar) तयार केलेला काढा. ऑलिव्ह पानांच्या काढ्याचे नियमित सेवन केले तर (Drink Olive Leaves Kadha To Control Blood Sugar) त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
ऑलिव्हच्या पानांचे फायदे
वेममेडेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑलिव्हच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि ते निरोगी पातळीवर कायम ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑलिव्हच्या पानांचा अर्क शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतो, जो मधुमेहासाठी सर्वात मोठा जोखमीचा घटक आहे.
आणखी बरेच फायदे
ऑलिव्हच्या पानांच्या काढ्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय, कर्करोग, पार्किन्सन, अल्झायमर इत्यादी अनेक जुनाट आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त हे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात आणि शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करतात.
असा बनवा काढा
ऑलिव्हची पाने पूर्णपणे स्वच्छ करून त्यांना एक ग्लास पाण्यात उकळावीत. जेव्हा उकळून ते पाणी अर्धे होईल, तेव्हा त्यात काळी मिरी आणि मीठ घालून तो प्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठाऐवजी मध वापरू शकता.