सामान्यपणे आपण पाहतो की, वाढत्या वयासोबत अनेकांच्या बुद्धीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. पण जर तुम्ही रोज एक तास सूडोकू आणि क्रॉसवर्ड्स खेळत असाल तर म्हातारपणी तुमचा मेंदू १० वर्षाच्या लहान मुलासारखा तल्लखपणे काम करू शकतो. हा दावा एका ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.
यूनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर आणि किंग्स कॉलेज लंडनमध्ये झालेल्या शोधानुसार, अंकांचं कोडं सोडवल्याने बुद्धी तल्लख होऊ शकते. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, केवळ एक तास असं केल्याने भविष्यात खोलवर प्रभाव दिसतो आणि डिमेंशियाचा धोका कमी असतो.
ब्रेन मांसपेशीसारखा, जेवढा वापर कराल तेवढा चांगला होईल
संशोधक डॉ. एनी कॉर्बेट यांच्यानुसार, अंकांडं कोडं किंवा क्रॉसवर्ड्स खेळणं मेमरीसाठी एक एक्सरसाइज आहे. याने लक्ष केंद्रीत होण्यासाठी आणि समस्येचं समाधान शोधण्याची क्षमता वाढते. मेंदूमध्ये अनेकप्रकारचे कनेक्शन असतात, ज्यांना दररोज कोडं सोडवण्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे या गोष्टींना रूटीनचा भाग करा.
या रिसर्चनुसार, मेंदू शरीरातील मांसपेशींप्रमाणे असतो. याचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं चांगलं असतं आणि याच्या क्षमतेच वाढ होते. याने तो समस्यांचा स्वीकार करणे शिकेल आणि त्यावर उपाय शोधण्यासही मदत करेल.
या रिसर्चसाठी ५० ते ९३ वयोगटातील १९ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात त्यांना विचारण्यात आलं की, ते महिन्यातून, आठवड्यातून आणि दररोज किती वेळा अंकांचं कोडं सोडवतात. यांची आठवडाभर ऑनलाइन टेस्ट करण्यात आली.
लागोपाठ झालेल्या १० टेस्टमध्ये अंक किंवा फोटोंच्या क्रमाबाबत विचारण्यात आले. यातील जे लोक रोज सूडोकू किंवा क्रॉसवर्ड्स खेळत होते त्यांना सर्वात जास्त गुण मिळाले. जे लोक रोज सूडोकू खेळत होते, त्यांचे १० पैकी ९ उत्तर बरोबर होती आणि त्यांनी उत्तरेही वेगाने दिली.