Obesity Day : कमी करण्याच्या टेन्शनमध्येच वाढत आहे वजन, जाणून घ्या वजन घटवण्याच्या खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:00 AM2019-10-11T10:00:48+5:302019-10-11T10:10:58+5:30

WHO च्या एका आकडेवारीनुसार, भारतात लठ्ठपणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. बालपणापासून होणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे.

Obesity Day: Instead of taking tension take these measures | Obesity Day : कमी करण्याच्या टेन्शनमध्येच वाढत आहे वजन, जाणून घ्या वजन घटवण्याच्या खास टिप्स!

Obesity Day : कमी करण्याच्या टेन्शनमध्येच वाढत आहे वजन, जाणून घ्या वजन घटवण्याच्या खास टिप्स!

Next

(Image Credit : lanap.com)

काही लोक शरीराचं थोड जरी वजन वाढलं तरी वजन कमी करण्याऐवजी ते वाढल्याचं टेन्शन घेणं सुरू करतात. मी लठ्ठ दिसतोय, लोक काय म्हणतील, मी कुठे जाऊ शकणार नाही, मित्र मला जाड्या म्हणतील, अशा गोष्टी अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकल्या असतीलच. अनेकदा लठ्ठपणामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो, कारण ते लठ्ठपणा कमी करण्याचं टेन्शन घेऊ लागतात.

लठ्ठपणामुळे डिप्रेशनचा धोका

एक्सपर्टही हे मान्य करतात की, लठ्ठपणा असेल तर लाइफस्टाईलशी निगडीत आजार आणि सोबतच डिप्रेशनचा धोका अधिक राहतो. कारण तुम्ही चारचौघात जाणं-येणं अव्हॉईड करू लागता आणि निराश राहू लागता. पण तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की, टेन्शन घेऊन लठ्ठपणा कमी नाही होणार तर आणखी वाढेल. कारण टेन्शन आणि निराशेत आपण जास्त खाऊ लागतो. तसेच वर्कआउटही करत नाहीत.  

(Image Credit : blog.ekincare.com)

WHO च्या एका आकडेवारीनुसार, भारतात लठ्ठपणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. बालपणापासून होणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. २०२५ पर्यंत भारतात १ कोटी ७० लाख लहान मुलं लठ्ठपणाने ग्रस्त होतील. आज आम्ही तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत. याने तुमचं टेन्शन न घेता वजन आणि लठ्ठपणा कमी करू शकाल.

बीएमआयवर लक्ष द्या

ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा सामान्यपणे बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून मोजला जातो. यात व्यक्तीची लांबी आणि त्यांच्या वजनाची सरासरी काढली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमचा बीएमआय किती आहे हे माहीत असायला हवं. 

स्वत:चं जेवण स्वत: तयार करा

(Image Credit : cheatsheet.com)

स्वत:चं जेवन स्वत: तयार करणं अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. ही हेल्दी राहण्याची आणि वजन कमी करण्याची चांगली पद्धत आहे. जेवण तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही कॉफी कॅलरी सुद्धा बर्न करू शकता. जेवण करण्याआधी कमीत कमी ३० ते ४० मिनिटे भाज्या धुणे, कापणे, शिजवणे आणि नंतर किचन स्वच्छ करण्यात घालवा. या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या साधारण १२८ कॅलरी बर्न होतात.

शक्य तेवढा वेळ उभे रहा

(Image Credit : menshealth.com)

अलिकडे एका जागेवर बसून काम करण्याचा संख्या वाढत आहे. अशात जास्तीत जास्त लोक ऑफिसमध्ये ८ ते १० तास कॉम्प्युटरसमोर बसलेले असतात आणि बसूनच काम करतात. पण अशात गजरेचं असतं की, तुम्ही जागेवरून उठावं आणि थोडी फिजिकल अ‍ॅक्टिविटी करावी. त्यामुळे एका दिवसात कमीत कमी ४० मिनिटे उभं राहणं गरजेचं आहे. पाण्याची बॉटल भरायला उठा, तुमच्या टेबलाच्या आजूबाजूला फिरा, काही वेळ उभे राहून काम करा. असं करून तुम्ही साधारण १०० ग्रॅम कॅलरी बर्न करू शकाल.

आहारावर लक्ष द्या

(Image Credit : medicalnewstoday.com)

रात्री कमी किंवा हलकं जेवण करा आणि जेवण केल्यावर थोडं फिरा. लगेच फिरू नका. जेवणाच्या थोड्या वेळानंतर फिरा. फास्ट फूड, जंक फूड, तेलकट काहीही खाणं टाळा. तसेच नियमित एक्सरसाइज करणं फार महत्वाचं आहे. तुमच्या चुकीच्या सवयी बदलाल तरच तुमचा लठ्ठपणा कमी होईल. नाही तर तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकणार नाही.


Web Title: Obesity Day: Instead of taking tension take these measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.