लिव्हरवर जमा झालेली चरबी झरझर गळून पडेल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितला जबरदस्त नॅचरल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:18 IST2025-03-25T11:17:10+5:302025-03-25T11:18:24+5:30

Liver Detox Kadha : महिला असो वा पुरूष कुणालाही हा आजार होऊ शकतो. हा एक गंभीर आजार असून वेळीच उपचार न केल्यास स्थिती पुढे गंभीर होऊ शकते.

Nutritionist suggests natural kadha for fatty liver | लिव्हरवर जमा झालेली चरबी झरझर गळून पडेल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितला जबरदस्त नॅचरल उपाय!

लिव्हरवर जमा झालेली चरबी झरझर गळून पडेल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितला जबरदस्त नॅचरल उपाय!

Liver Detox Kadha : आजकाल अशा अशा आजारांबाबत माहिती समोर येत आहे, ज्या आजारांबाबत आधी कधी ऐकायलाही मिळत नव्हतं. असाच एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजेच लिव्हरवर चरबी जमा होणे. अलिकडे ही एक गंभीर समस्या बनली आहे. महिला असो वा पुरूष कुणालाही हा आजार होऊ शकतो. हा एक गंभीर आजार असून वेळीच उपचार न केल्यास स्थिती पुढे गंभीर होऊ शकते.

फॅटी लिव्हरची कारणं...

फॅटी लिव्हरची समस्या होण्याची कारणं वेगवेगळी असतात. यात जास्त मद्यसेवन, लठ्ठपणा, बॅड कोलेस्टेरॉल आणि टाइप २ डायबिटीस इत्यादींचा मुख्यपणे समावेश होतो. अनेकांचा असा समज आहे की, फॅटी लिव्हरची समस्या केवळ दारू पिणाऱ्या लोकांनाच होते. असं अजिबात नाहीये. कारण जे लोक दारू पित नाहीत त्यांना सुद्धा ही समस्या होऊ शकते. 

फॅटी लिव्हरची समस्या काही उपचार घेऊन आणि लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून दूर केली जाऊ शकते. काही असे नॅचरल उपायही आहेत जे ही समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरू शकतात. असाच एक उपाय न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी शेअर केला आहे.

फॅटी लिव्हरचा उपाय

श्वेता शहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यासाठी एका काढ्याची रेसिपी पोस्ट केली आहे. या काढ्याच्या मदतीनं लिव्हर डिटॉक्स होतं आणि लिव्हरची काम करण्याची क्षमताही वाढते. हा काढा बनवण्यासाठी हळद, आलं आणि गुळवेलचं पावडर या गोष्टींची गरज लागेल.

कसा बनवाल काढा?

श्वेता शहा यांच्यानुसार, हा काढा तयार करण्यासाठी अर्धा टीस्पून गुळवेल पावडर, अर्धा टेबल स्पून हळध आणि आल्याच्या २ ते ३ छोट्या स्लाइस व दोन कप पाणी हवं.

सगळ्यात आधी दोन कप पाणी उकडून घ्या. त्यात गुळवेल पावडर, हळद आणि आलं टाका. हे १० ते १५ मिनिटं उकडू द्या. पाणी एक कप होईपर्यंत उकडा. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं.

कसा मिळेल फायदा?

हा खास नॅचरल काढा लिव्हर डिटॉक्स करण्याचं काम करतो. पचनक्रिया बिघडलेली असेल तर ती सुद्धा यानं चांगली होते. शरीराच्या आतील आणि लिव्हरवरील सूजही यानं कमी होते. या काढ्याचा आणखी एक फायदा म्हणजे यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. 
 

Web Title: Nutritionist suggests natural kadha for fatty liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.