घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:32 IST2025-06-23T17:31:35+5:302025-06-23T17:32:14+5:30

अमेझॉनने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या लॅब टेस्ट करू शकता.

Now lab tests will be done at home; report will be available in 6 hours! Amazon has launched a new health service | घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा

घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा

Amazon Diagnostics: डॉक्टर आपल्याला अनेकदा विविध प्रकारच्या चाचण्या करायला सांगतात, या चाचण्या करण्यासाठी क्लिनिक किंवा लॅबमध्ये जावे लागते. पण, आता याची गरज भासणार नाही. Amazon ने एक नवीन फीचर - Amazon Diagnostics लॉन्च केले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या घरबसल्या विविध प्रकारच्या चाचण्या करू शकता. विशेष म्हणजे, फक्त 6 तासांत तुम्हाला याचा डिजिटल रिपोर्टही मिळेल. 

घरी होणार ब्लॅड सँपल कलेक्शन
ही सेवा सध्या दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये 450 हून अधिक पिन कोड सामील आहेत. Amazon युजर्स अॅपवरुन 800 हून अधिक लॅब टेस्ट बुक करू शकतात. त्यांच्या सोयीनुसार टाइम स्लॉट निवडू शकतात आणि नंतर त्यांचा नमुना घेण्यापासून ते रिपोर्टपर्यंत सर्वकाही ट्रॅकही करू शकतात. यासाठी, Amazon ने ऑरेंज हेल्थ लॅब्सशी भागीदारी केली आहे. ही बंगळुरुस्थित डायग्नोस्टिक कंपनी असून, अनेक शहरांमध्ये होम टेस्टिंग सुविधा पुरवते. 

बुकिंग प्रक्रिया
तुम्हाला Amazon अॅपवरुन टेस्ट बुक करुन आपला इच्छित टाईम स्लॉट निवडावा लागेल. त्यानंतर एक प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तुमच्या घरी येईल आणि सँपल घेईल. मूलभूत चाचण्यांचा अहवाल काही तासांत तुमच्या फोनवर पाठवला जाईल.

एकाच अॅपमध्ये संपूर्ण आरोग्य सेवा 
अमेझॉन आधीपासून Amazon फार्मसीद्वारे घरपोहोच औषधे पुरवणे आणि Amazon क्लिनिकद्वारे ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला पुरवण्यासारख्या सुविधा देत आहे. आता लॅब चाचण्यांची सुविधादेखील जोडली जात आहेत. म्हणजेच, तुम्हाला एकाच अॅपवरुन डॉक्टरांशी बोलणे, चाचण्या करणे आणि औषधे खरेदी करण्याचा पर्याच मिळतो. Amazon चे आरोग्य सेवा प्रमुख जयरामकृष्णन बालसुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की त्यांचे उद्दिष्ट भारतातील आरोग्यसेवा "सोपी आणि विश्वासार्ह" बनवणे आहे.

भविष्यात अधिक शहरांमध्ये विस्तार होणार
सध्या ही सेवा फक्त 6 शहरांमध्ये सुरू झाली आहे, परंतु जर प्रतिसाद चांगला असेल, तर ती लवकरच अधिक शहरांमध्ये सुरू केली जाऊ शकते. भारतातील डिजिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हा उपक्रम एक मोठे पाऊल मानले जातोय.

Web Title: Now lab tests will be done at home; report will be available in 6 hours! Amazon has launched a new health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.