कोरोनामुक्त रुग्णांसाठी धोक्याची घंटा! म्युकरमायकोसिसनंतर 'या' भयानक आजाराने डोके वर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:25 PM2021-10-14T17:25:21+5:302021-10-14T17:35:41+5:30

कोरोनातून बरं झाल्यानंतर अनेकांना म्युकरमायकोसिस झाल्याची प्रकरणे समोर आली होती पण यात अशाच रुग्णांमध्ये मणक्यात बुरशी होण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही कोरोनामुक्‍त व्यक्तींना म्युकरमायकोसिसनंतर आता मणक्‍यात बुरशी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

now fungal infection in covid recovered patient all you need to know | कोरोनामुक्त रुग्णांसाठी धोक्याची घंटा! म्युकरमायकोसिसनंतर 'या' भयानक आजाराने डोके वर काढले

कोरोनामुक्त रुग्णांसाठी धोक्याची घंटा! म्युकरमायकोसिसनंतर 'या' भयानक आजाराने डोके वर काढले

Next

कोरोनाच्या कहरातून सावरत असल्याची चिन्हे दिसत असताना आता नवीन रोगाने डोकं वर काढले आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर अनेकांना म्युकरमायकोसिस झाल्याची प्रकरणे समोर आली होती. आता कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मणक्यात बुरशी होण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही कोरोनामुक्‍त व्यक्तींना म्युकरमायकोसिसनंतर आता मणक्‍यात बुरशी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असा संसर्ग झालेले चार रुग्ण पुण्यात आढळल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग यांनी DNA या वृत्तापत्राला सांगितले.

कोरोना झाल्यानंतर ऑक्‍सिजनची कमतरता निर्माण झालेल्या, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन लावण्यात आलेल्या रुग्णांना या बुरशीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये डायबिटीस आदी आजार असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. यामध्ये केवळ काळीच नव्हे तर पिवळी आणि पांढरी बुरशीही आढळून आली होती.

मध्यंतरी फुफ्फुसात ही बुरशी आढळली होती. मात्र, आता थेट मणक्‍यात ही बुरशी दिसल्याने चिंता वाढली आहे. कोरोनानंतर आरोग्य समस्या घेऊन आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य ताप, तीव्र पाठदुखी अशी लक्षणे होती. त्यांच्यावर उपचार केले असता कोणताच गुण आला नाही. त्यामुळे त्यांच्या मणक्‍याचा 'एमआरआय' केला असता मणक्‍यामध्ये एकप्रकारच्या बुरशीची वाढ झाल्याचे दिसून आले. हा प्रकार दुर्मिळ असून, यावर उपचार करणे कठीण असल्याचे मत डॉ. प्रयाग यांनी व्यक्त केले आहे. ही बुरशी मणक्‍याच्या पोकळीत वाढत असल्याने, शस्त्रक्रिया आणि उपचार करणे अवघड असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: now fungal infection in covid recovered patient all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app