अखेर फेसबुकची सवय लागण्याच्या कारणाचा खुलासा, रिसर्चमधून कारण स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 10:10 IST2019-05-31T10:05:22+5:302019-05-31T10:10:29+5:30
फेसबुकची सवय लागली म्हणजे संबंधित व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. पण ही सवय त्यांना चुकीच्या वळणावर घेऊन जाते.

अखेर फेसबुकची सवय लागण्याच्या कारणाचा खुलासा, रिसर्चमधून कारण स्पष्ट
(Image Credit : sott.net)
अनेकजणांना असं वाटतं की, जेव्हा ते स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडियावर वेळ घालवून काही वेळेसाठी का होईना त्यांना तणावातून मुक्ती मिळते. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चच्या निष्कर्षावर नजर टाकली तर हे बघायला मिळतं की, जे लोक नेहमी स्ट्रेसमध्ये असतात, त्यांना फेसबुकची किंवा सोशल मीडिया साइट्सची सवय लागते.
१८ ते ५६ वयोगटातील फेसबुक यूजर्सवर रिसर्च
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ऑनलाइन सर्व्हेच्या निष्कर्षांचं विश्लेषण केलं. ज्यात १८ ते ५६ वयोगटातील ३०९ फेसबुक यूजर्सना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या रिसर्चच्या मुख्य अभ्यासिका जूलिया ब्रॅलोव्सकाया सांगतात की, आम्ही खासकरून या सर्व्हेसाठी विद्यार्थ्यांना निमंत्रित केलं होतं. कारण विद्यार्थी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने फार जास्त स्ट्रेसमध्ये असतात. विद्यार्थ्यांना नेहमीच यशस्वी होण्यासाठी प्रेशर दिलं जातं. बऱ्याच मुला-मुलींना आपला परिवार आणि सोशल सर्कल सोडून लाइफमध्ये पहिल्यांदा घर चालवावं लागतं, नवीन नाती तयार करावी लागतात.
ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीकडे किती मिळतो सपोर्ट
या रिसर्चचे निष्कर्ष सायकियाट्री रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेत. अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना प्रश्न विचारला की, सोशल नेटवर्किंग साइट्स त्यांचा स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात किती मदत करतात आणि तसेच त्यांना स्ट्रेस असताना ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीकडे किती सपोर्ट मिळतो. सोबतच यूजर्सनाही असेही विचारण्यात आले की, ते दररोज फेसबुकवर किती वेळ घालवतात आणि जेव्हा ते ऑनलाइन नसतात तेव्हा त्यांना कसं वाटतं.
फेसबुकची सवय सोडण्यासाठी उपाय
रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, स्ट्रेसचा स्तर जेवढा जास्त होता, ती व्यक्ती तेवढा जास्त वेळ फेसबुकवर घालवत होती. जूलिया सांगतात की, आमच्या रिसर्चचे निष्कर्ष हे दाखवतात की, रोजच्या स्ट्रेसची गंभीरता आणि फेसबुक इंगेजमेंटमधे सकारात्मक नातं आहे. ज्यामुळे हे म्हटलं जाऊ शकतं की, स्ट्रेसमुळे सोशल नेटवर्किंग साइट्सची सवय लागते. त्यावर अनेकदा अवलंबून रहावं लागतं. पण जर तणावाचा सामना करायचा असेल आणि व्यक्तीला परिवार आणि मित्रांची मदत मिळेल तर ही सवय कमी केली जाऊ शकते.