गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. व्हायरसचं बदलतं स्वरूप चिंतेचं कारण आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा XFG व्हेरिएंट समोर आला असून त्याला स्ट्रेटस असं म्हटलं जातं. जानेवारीमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला आणि आता तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे आणि भारतासह संपूर्ण जगाने सतर्क राहण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये स्ट्रेटस पहिल्यांदा आढळून आला. जूनपर्यंत तो ३८ देशांमध्ये पसरला होता. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने (CDC) म्हटलं आहे की ,अमेरिकेच्या नऊ राज्यांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामध्ये न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअर, वर्मोंट, मिशिगन, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, नॉर्थ डकोटा आणि साउथ डकोटा यांचा समावेश आहे
स्ट्रेटसची 'ही' आहेत लक्षणं
- श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत जडपणा जाणवणं- घसा खवखवणं - डोकेदुखी आणि अंगदुखी- पोट खराब होणं किंवा भूक न लागणं- मळमळ आणि उलट्या- मानसिक थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण- चव आणि वासाची जाणीव कमी होणं
अशी घ्या आरोग्याची काळजी
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधं घ्या.- कोमट पाणी पिणं, वाफ घेणं आणि हळदीचे दूध पिणं यासारखे घरगुती उपचाराने आराम मिळू शकतो.- नीट विश्रांती घ्या, खूप दगदग किंवा जास्त काम करू नका.- संतुलित आहार घेऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट सतत येत असतात, परंतु सावधगिरी आणि सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, हात धुणं, पोषक आहार घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे.
Web Summary : A new COVID variant, XFG or 'Straetus,' is spreading globally, causing concern. Symptoms include breathing issues, sore throat, and fatigue. Experts advise precautions like masking, handwashing, and a healthy diet. Early detection and care are crucial to combat the spread.
Web Summary : कोरोना का नया वैरिएंट, XFG या 'स्ट्रेटस', दुनिया भर में फैल रहा है, जिससे चिंता बढ़ रही है। लक्षणों में सांस लेने में तकलीफ, गले में खराश और थकान शामिल हैं। विशेषज्ञों ने मास्क पहनने, हाथ धोने और स्वस्थ आहार लेने जैसी सावधानियां बरतने की सलाह दी है। शुरुआती पहचान और देखभाल महत्वपूर्ण है।