'या' वेळेला हार्ट अटॅकचा धोका अधिक आणि गंभीर असतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:10 IST2019-05-20T10:03:24+5:302019-05-20T10:10:29+5:30
खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, शारीरिक हालचाल कमी, एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, डिप्रेशन या आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना हृदयरोगाचा धोका जाणवतो.

'या' वेळेला हार्ट अटॅकचा धोका अधिक आणि गंभीर असतो!
अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात हृदयरोगांचाही धोका वाढला आहे. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, शारीरिक हालचाल कमी, एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, डिप्रेशन या आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना हृदयरोगाचा धोका जाणवतो. आता तर कमी वयातही हृदयासंबंधी समस्या होतात. हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो. पण अभ्यासकांच्या एका रिपोर्टनुसार, सकाळी येणारा हार्ट अटॅक रात्री येणाऱ्या हार्ट अटॅक किंवा कार्डिआक अरेस्टच्या तुलनेत जास्त गंभीर असतो.
ट्रेंड्स इन इम्यूनोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये याबाबत चर्चा केली. यात चर्चा केली गेली की, कशाप्रकारे एखादी खास वेळ आजाराच्या गंभीरतेला प्रभावित करते. यात हार्ट अटॅकपासून ते अॅलर्जीसारख्या आजारांचा समावेश आहे.
रोगप्रतिकारक क्षमतेची प्रतिक्रिया
या रिसर्चमध्ये हे दाखण्यात आले की, शरीराची रोगप्रतिकारक क्षमतेची प्रतिक्रिया ज्यात स्पेशलाइज्ड पॅथोजन फायटिंग सेल्स असतात, ते अनेक आठवड्यात विकसित होतात आणि ते शरीराच्या अंतर्गत घड्याळाच्या कंट्रोलमध्ये राहतात. अभ्यासकांनी एक नाही तर अनेक रिसर्चना एकत्र संग्रहित केले आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, शरीराची अंतर्गत घड्याळाच्या रिदम आणि रोगप्रतिकारक क्षमतेच्या प्रतिक्रियेत काय आणि कसं कनेक्शन आहे.
इम्यून सेल्सची प्रतिक्रिया
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी वेगवेगळ्या रिसर्चचा अभ्यास केला आणि तुलना केली की, शरीरातील रोगप्रतिकारक सेल नॉर्मल परिस्थितीमध्ये, सूज आणि वेदनेच्या स्थितीत, आजारी होण्याच्या स्थितीमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला कसे प्रतिक्रिया देतात.
हार्ट अटॅकची कारणं
आजची लाइफस्टाइल तरुणांमध्ये वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरत आहे. एकाच जागी बसून काम करण्याची सवय, जंक फूड, फास्ट फूड, पुरेशी झोप न घेणे, मद्यसेवन आणि धुम्रपान यामुळे कमी वयाच्या तरुणांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. यातील काहींना तर उपचार घेण्याचीही संधी मिळत नाही आणि ते जीव गमावून बसतात. कमी वयात हार्ट अटॅकचं कारण जेनेटिक असतं, आणि आताची खराब लाइफस्टाइल हा आजार आणखी वाढवतात.
सिगारेटची सवय
धुम्रपान हे हृदयासाठी किती घातक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याने हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला ही सवय असेल ती लगेच सोडाय कारण सिगारेटमुळे आणि त्यातील तंबाखूमुळे शरीरातील ऑक्सिजनवर नकारात्मक प्रभाव पडतो. सोबतच तंबाखूमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. धुम्रपान आणि मद्य यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे हार्ट अटॅक येतो.
टेंशन आणि अपयशाचा दबाव
तणाव हा हृदयासाठी फारच घातक असतो. डिप्रेशनमुळे हृदयाचा आजार गंभीर रूप धारण करतो. अनेकदा हे जीवघेणंही ठरू शकतं. एका शोधानुसार, हृदय रोगाच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी एकाला गंभीर डिप्रेशनची समस्या असते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, राग, चिडचिड यामुळे रक्तदाब वाढतो. डिप्रेशनने ग्रस्त लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 4 पटीने जास्त असते.
शारीरिक मेहनतीची कमतरता
आपल्या शरीरासाठी जितका आहार गरजेचा असतो तितकाच त्या आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात 500 ते 950 कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल महत्वाची असते. जर तुम्ही शरीराची फार हालचालच करत नसाल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम नाही केल तरी शारीरिक हालचाली होणं गरजेचं आहे.
वजन वाढणं
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वजन कमी ठेवायला हवं. जाडपणा ही सवय नाहीये, हा चुकीचं खाणं-पिणं आणि अंसतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जाडेपणा उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टेंस यांचं नेतृत्व करतो. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
चुकीचं खाणं-पिणं
कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार हृदयाचा सर्वात चांगला मित्र असतो. ट्रान्स फॅटमुळे हृदय रोगाची समस्या अधिक वाढते. ओमेगा -3 फॅटी अॅसिडने भरपूर पदार्थ हृदय रोगाची शक्यता कमी करतात. फास्ट फूडच्या सेवनामुळे हृदय रोगाची शक्यता अधिक वाढते.