शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 16:20 IST

CoronaVirus News & Upadates : कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देशातील ख्रिसमस बबल रद्द करण्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. आतापर्यंत कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसचा प्रसार अजूनही आटोक्यात आलेला नाही. आता कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देशातील ख्रिसमस बबल रद्द करण्याची घोषणा केली आहे. युरोपातील जर्मनीनेही यापूर्वी ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या कालखंडात देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटनसह इतर देशात सण उत्सवांच्या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

ब्रिटनचे आरोग्य सचिन मॅट हँकॉक यांनी  सांगितले की, ''देशातील ईशान्य भागात कोरानाच्या नव्या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या भागातील १००० पेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आहे. संपूर्ण ब्रिटनमध्येही या महिनाभरात कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांनी राजधानी लंडन आणि ईशान्य भागातील नागरिकांना ३० डिसेंबरपर्यंत घरात राहण्याचे आदेश दिले आहेत.'' 

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

देशातील आरोग्य विभागाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (WHO) याबाबत माहिती दिली आहे. या नव्या ‘कोरोना व्हायरस स्ट्रेन’ चा देशात वेगाने प्रसार होत आहे. या आजारावर कोरोनाचे औषध लागू होईल का, याबाबत अजून कोणतीही माहिती देणे शक्य नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

ख्रिसमस कार्यक्रम रद्द

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढल्याने पंतप्रधान जॉन्सन यांनी देशातील ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द केले आहे. याआधी ख्रिसमसच्या कार्यक्रमांसाठी नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकानं घेतला होता. राजधानी लंडनसह अनेक भागात तिसऱ्या श्रेणीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या भागात गरज पडली तर लवकरच चौथ्या टप्प्यातील निर्बंध लादण्यात येणार आहेत.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ एवढी झाली आहे. एक कोटी कोरोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असून, सध्या देशात केवळ ३ लाख ८ हजार ७५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार १५३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४५ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख आठ हजार ७५१ एवढी आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या