पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:15 PM2020-12-18T16:15:39+5:302020-12-18T16:44:35+5:30

Health Tips in Marathi : या मीठाच्या हलक्या गुलाबी रंगात असे बरेच गुण आढळतात, जे सामान्य मिठापेक्षा अधिक  परिणामकारक ठरतात. हिमालयीन मीठाच्या पाण्यात पाय भिजवून आपण अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. 

Unbelievable benefits of foot soaks with himalayan salt water or pink salt | पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

googlenewsNext

सैंधव मीठ साधारणपणे व्रत आणि सणांच्या वेळी वापरले जाते, कारण ते पांढरं मीठ म्हणजेच समुद्राच्या मीठापेक्षा पवित्र मानले जाते.  आज आम्ही तुम्हाला मीठाच्या पाण्याचे शरीराला कसे फायदे होतात. याबबत सांगणार आहोत. सैंधव मीठ हिमालयीन मीठ म्हणून देखील ओळखले जाते. या मीठाच्या हलक्या गुलाबी रंगात असे बरेच गुण आढळतात, जे सामान्य मिठापेक्षा अधिक  परिणामकारक ठरतात. हिमालयीन मीठाच्या पाण्यात पाय भिजवून आपण अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. 

या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं. अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे, मात्र त्यात अनेकविध खनिजं भरपूर प्रमाणात सापडतात. सैंधव मीठ नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे, यामुळे शरीराची वेदना सहजपणे दूर होते. रोज या मीठाचा वापर करणं योग्य ठरनाही. त्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीनवेळा अंघोळीच्या पाण्यात हे मीठ घाला किंवा कामाकरून थकून घरी आल्यानंतर गरम पाण्यात हे मीठ घालून १० मिनिटांसाठी पाण्यात पाय बुडवून शेक घ्या.

सैंधव मिठाचे फायदे

सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते. 

काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो.

केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो.  केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं. सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो. 

श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.

पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठी देखील वापरलं जातं.

1-

ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सैंधव मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.

भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.
वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.

थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी फायदयाचे ठरतात मेथीचे लाडू; वाचा बनवण्याची योग्य पद्धत अन् फायदे

 या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्सुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते.  हे मीठ  वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.
रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Unbelievable benefits of foot soaks with himalayan salt water or pink salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.