(Image Credit : CABA)
झोपेबाबत सतत वेगवेगळे रिसर्च होत असतात आणि झोप किती महत्त्वाची आहे नेहमी सांगितलं जातं. अमेरिकेच्या नासा या संस्थेने एका रिसर्चच्या माध्यमातून हे सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला दिवसा झोप येत असेल तर त्याने निश्चिंत डुलकी घ्यावी. कामावेळी डुलकी घेतल्याने त्या व्यक्तीला फ्रेश वाटेल आणि त्याचा काम करण्याचा स्पीडही वाढेल.
१० ते २० मिनिटांची झोप पुरेशी
दिवसभरात एक वेळ अशी असते जेव्हा प्रत्येक व्यक्तीला फार थकवा जाणवतो. अशात स्वत:ला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी एकतर ते थोडी झोप घेतात किंवा चहा-कॉफीचा आधार घेतात. पण नासानुसार, अशावेळी १० ते २० मिनिटांची झोप घेणे चांगले ठरेल. लगोपाठ ७ ते ८ तास काम केल्यानंतर काही वेळेसाठी घेतलेली एक पॉवर नॅप तुम्हाला अनेक तासांसाठी रिचार्ज करते आणि तुम्ही पुन्हा नव्याने काम करु शकता.
नासानुसार, २६ मिनिटांपर्यंत कॉकपिटमध्ये झोपणारा पायलट इतर पायलट्सच्या तुलनेत ५४ टक्के सतर्त आणि नोकरीच्या प्रदर्शनात ३४ टक्के जास्त चांगलं काम करताना आढळला आहे. नासामध्ये झोपेच्या तज्ज्ञांनी कामाच्या मधे काही वेळ झोप घेण्याच्या प्रभावांवर रिसर्च केला. त्यातून त्यांना आढळलं की, डुलकी घेणे म्हणजेच नॅप घेतल्याने व्यक्तीचा मूड, सतर्कता आणि कामात अधिक सुधारणा होते.
किती एनर्जी मिळते?
नासाच्या वैज्ञानिकांनी एका शोधात सांगितले की, दिवसा घेतली गेलेली एक डुलकी एक रात्र झोपून मिळणाऱ्या एनर्जी इतकी एनर्जी देते. नॅपच्या प्रभावांवर रिसर्च करताना हे आढळले की, डुलकी घेतल्याने व्यक्तीचा मडू, कार्य करण्याची क्षमता आणि प्रदर्शन वेगाने वाढतं. ब्रॉक विश्वविद्यालयात मनोविज्ञान आणि तंत्रिका विज्ञानचे प्रोफेसर असलेले किम्बर्ली कोटे यांच्यानुसार, फार जास्तवेळ घेतलील डुलकी तुम्हाला झोपेच्या स्थितीत नेऊ शकते. त्यामुळे नासाने सल्ला दिला आहे की, १० ते २० मिनिटांची डुलकी घ्यावी.
१० ते २० मिनिटांची डुलकी घेतल्याने थकलेला मेंदू आणि सुस्त झालेल्या मांसपेशींना आराम मिळतो. ज्याने तुम्हाला फ्रेश वाटतं. जर तुम्ही असं करत नसाल तर ब्रेनची कार्यक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्ही थकलेले आणि सुस्त राहू लागता.
७७ टक्के लोक ऑफिसमध्ये घेतात झोप
वर्षभर चालणाऱ्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्ड २०१९ मध्ये झोपण्याच्या पॅटर्नबाबत काही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. जवळपास १६ हजार उत्तरदात्यांसोबत ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्ड २०१९ मध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात सांगण्यात आले आहे की, अपुरी झोप भारतात एक देशव्यापी समस्या आहे.