केस गळू नये म्हणून कोणत्या तेलाने करावी मालिश? वाचून रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 02:08 PM2024-04-09T14:08:35+5:302024-04-09T14:10:56+5:30

Hair Fall Remedies : तेलाने मालिश करणे हा उपाय अनेक वर्षांपासून केला जातो. त्यात जर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर फायदा अधिक होतो. 

Mustard and coconut oil beneficial for hair growth, know how to use it | केस गळू नये म्हणून कोणत्या तेलाने करावी मालिश? वाचून रहाल फायद्यात...

केस गळू नये म्हणून कोणत्या तेलाने करावी मालिश? वाचून रहाल फायद्यात...

Hair Fall Remedies : केसगळतीची समस्या आजकाल वेगवेगळ्या कारणाने कमी वयातही होऊ लागली आहे. इतकंच नाही तर कमी वयात केस पांढरेही होऊ लागले आहेत. कारण लोक केसांची योग्य ती काळजी घेत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी केसांची कोणत्या तेलाने मालिश करावी ते सांगणार आहोत. तेलाने मालिश करणे हा उपाय अनेक वर्षांपासून केला जातो. त्यात जर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर फायदा अधिक होतो. 

मोहरीचं तेल

मोहरीचं तेल केसांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने केसगळती थांबते सोबतच केसांची वाढ होण्यासही मदत होते. पण अनेकांना केसांना मोहरीचं तेल लावण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. आम्ही ही पद्धत सांगणार आहोत.

मोहरीच्या तेलाने रोज केसांची मालिश करावी. पण असं नाहीये. आठवड्यातून दोन दिवसही मोहरीच्या तेलाने मालिश केली तरी फायदा होतो. मोहरीचं तेल लावण्याआधी त्यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या टाकून तेल गरम करावे.

तेल थंड झालं की, त्यात लिंबू मिश्रित करा आणि केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. लांब केसांना बोटांच्या मदतीने हळूहळू तेल लावा. यावेळी नखे वाढलेले नसावेत नाही तर डोक्याच्या त्वचेला इजा होण्याची इजा होण्याची शक्यता असते. 
मोहरीचं केल अनेक वर्षांपासून मसाज करण्यासाठी वापरलं जातं.

आयुर्वेदानुसार, मोहरीच्या तेलाचा वापर केसगळती थांबवण्यासाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये हीना मेहंदीची पाने शिजवून हे मिश्रण लावल्याने केस मजबूत होतात. केसांना तेल लावल्यावर कमीत कमी 3 ते 4 तास तसेच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस चांगले धुवा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा ही प्रक्रिया रिपिट करा. काही दिवसातच याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल. 

खोबऱ्याचं कोमट तेल

खोबऱ्याच्या कोमट तेलाने केसांना मालिश केल्यानं काही दिवसांतच केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कोमट तेल केसांना लावल्यानं तेल थेट केसांच्या मुळापर्यंत पोहोचते. सामान्य तेलापेक्षा कोमट तेलानं मालिश करणं केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं.

कोमट तेल केसांना लावल्यानं ते थेट केसांच्या मुळापर्यंत जातं. यामुळे केसांच्या मुळांजवळील स्कॅल्पवर मॉइश्चर(डोक्याची त्वचा) टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस आणि स्कॅल्पचे आरोग्य चांगले राहते. कोमट तेलानं मालिश केल्यानं ब्लड फ्लो नीट राहतो. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते. कोमट तेलानं मालिश केल्यानं केस गळणं कमी होते. मालिश करताना केस थेट मुळांजवळ गेल्यानं केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. केसांमध्ये कोंडा झाला असेल तरीदेखील कोमट तेलानं केसांना मालिश करणं फायदेशीर ठरतं.

Web Title: Mustard and coconut oil beneficial for hair growth, know how to use it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.