कोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:37 AM2021-05-16T10:37:41+5:302021-05-16T10:54:15+5:30

Mucormycosis The black fungus : म्यूकोरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हे ब्लॅक फंगस म्हणून देखील ओळखले जाते.

Mucormycosis : Coronavirus update symptoms of mucormycosis black fungus know what to do and what not to do to avoid | कोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही 

कोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही 

googlenewsNext

देशभरात कोरोना संक्रमणानं कहर केला आहे. दुसरीकडे म्यूकरमायकोसिस संक्रमित लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता या व्हायरसनं लोकांच्या डोळ्यांवरही आक्रमण करायला सुरूवात केली आहे. जे लोक कोरोनाव्हायरसशी लढून बरे झाले आहेत. त्यांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्यूकरमायकोसिस या आजाराचा  धोका जास्त जाणवत आहे. या आजाराची लक्षणं काय आहेत. तसंच बचावाचे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने ब्लॅक फंगसबाबत काही महत्वाची माहिती दिली आहे. त्याच्या लक्षणांबद्दलही सांगितले, जे आपण कधीही दुर्लक्ष करू नये आणि ही लक्षणे दिसताच आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.  यात नाक बंद होणं, डोळ्यांना कमी दिसणं, डोळ्यांमधील वेदना, डोकेदुखी, गाल किंवा डोळ्यांमध्ये सूज येणं, दात दुखणे, तोंडावरील वेदना, दात हलके होणं, नाकात काळा पापुद्रा येणं, मानसिक स्थितीत बदल होणं, भ्रम होणं यांचा समावेश आहे. 

बचावासाठी काय करायचं?

हायपरग्लाइसीमिया (रक्तातील साखर) नियंत्रित करा.

कोरोनामधून बरे झाल्यानंतरही रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे परीक्षण करा.

फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टिरॉइड्स वापरा.

ऑक्सिजन थेरपी दरम्यान फक्त एका ह्युमिडिफायरसाठी शुद्ध पाणी वापरा.

जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच अँटीफंगल औषधे वापरा.

काय नाही करायचं?

आपण ब्लॅक फंगसला वाढण्यापासून रोखू इच्छित असाल तर लक्षणं दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा.
नाकातील सर्व प्रकरणांना बॅक्टेरियातील सायनोसायटिस म्हणून विचारात घेण्याची चूक करू नका, आणि विशेषतः कोरोना आणि इम्युनोसप्रेशनच्या बाबतीत, अशी चूक अजिबात करू नका.

बचावाचे उपाय

धूळ असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करा

माती, धूळ अशा ठिकाणी जाताना पायात बुट, सॉक्स, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.

वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्या. 

डायबिटीस कंट्रोल, इम्यूनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयड्सचा कमीत कमी वापर करून तुम्ही या आजारापासून लांब राहू शकता.

काय आहे म्यूकोरमायकोसिस

म्यूकोरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हे ब्लॅक फंगस म्हणून देखील ओळखले जाते. त्याचा परिणाम नाक, डोळे, मेंदूत दिसून येतो. जेव्हा ब्लॅक फंगस येते तेव्हा लोक त्यांचे दृष्टी गमावतात. गंभीर संक्रमण झाल्यास यामुळे काही रूग्णाच्या जबडा आणि नाकाची हाड वितळते. कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल?

जर रुग्ण वेळेवर ठीक बरा होत नसेल तर मृत्यू देखील होऊ शकतो. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉक्टर व्हीके पॉल यांनी यापूर्वी असे म्हटले होते की म्यूकोरामायसिस हा 'म्यूकोर' नावाचा एक बुरशीजन्य रोग आहे जो बहुधा शरीरातील ओल्या पृष्ठभागावर आढळतो.  म्युकोरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Web Title: Mucormycosis : Coronavirus update symptoms of mucormycosis black fungus know what to do and what not to do to avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.