सकाळचा नाश्ता न करणं म्हणजे 'या' घातक आजारांना आमंत्रण देणं, वेळीच काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:32 IST2022-04-15T17:30:37+5:302022-04-15T17:32:38+5:30
१२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.

सकाळचा नाश्ता न करणं म्हणजे 'या' घातक आजारांना आमंत्रण देणं, वेळीच काळजी घ्या
मॉर्निंग ब्रेकफास्ट (Morning breakfast) म्हणजे नाश्ता हा दिवसाचा पहिला आणि महत्त्वाचा आहार असतो. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, पौष्टिक आरोग्यदायी नाश्त्यातून ती मिळू शकते. रोजच्या घाईगडबडीत लोक अनेकदा दिवसातील हा सर्वात महत्त्वाचा आहार टाळतात. १२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.
वजन वाढणे
जेव्हा तुम्ही दुपारपर्यंत उपाशी राहता तेव्हा आपल्या शरीराला जास्त उष्मांक असलेल्या अन्नाची गरज असते. भूक कमी करण्यासाठी काहीजण गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खातात. त्यामुळे वजन वाढतं.
मधुमेहाचा धोका
जेव्हा तुम्ही नाश्ता चुकवता आणि दीर्घकाळानंतर जेवता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अचानक वाढते. या प्रक्रियेत, लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
स्मृतिभ्रंश
जपानी जर्नल ऑफ ह्युमन सायन्सेस ऑफ हेल्थ-सोशल सर्व्हिसेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना मानसिक आजार होऊ शकतात. मेंदूच्या पेशींचे कार्य मर्यादित होते आणि तुमची संज्ञानात्मक क्षमता कमी होते, ज्यामुळे स्मृतिभ्रंशसारखे गंभीर आजार होतात.
मायग्रेन
नाश्ता न केल्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते, परिणामी तुमचा बीपी वाढतो. उच्च रक्तदाबामुळे, सुरुवातीला किरकोळ डोकेदुखी होऊ शकते जी नंतर गंभीर मायग्रेनमध्ये बदलू शकते.
चयापचयावर परिणाम
आपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा तुम्ही दिवसाचा पहिला आहार स्कीप करता तेव्हा ते चयापचय क्रियांना अडथळा आणते आणि ही प्रक्रिया मंदावते.
प्रतिकारशक्ती कमी होते
न्याहारीमधून आवश्यक पोषक घटक शरीराला मिळणं गरजेचे असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असते. न्याहारी न केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या काम करू शकत नाही, ज्यामुळे तुम्ही लवकर आजारांना बळी पडता.