Monsoon season gives lot of infection ministry of ayush suggest some home remedies | पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक आजारांशी सामना करावा लागतो. सध्या कोरोनाच्या माहामारीने थैमान घातल्यामुळे सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण पसरलं आहे. आजारी पडण्याची आणि दवाखान्यात जाण्याची लोकांच्या मनात धास्ती आहे. कारण कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही वाढत आहे. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्यासह मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार पसरतात.

या आजारांपासून लांब राहण्यासाठी आयुषमंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचा वापर केल्यानं तुम्ही कोणत्याही ऋतूत फीट राहाल. तसंच आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होईल. स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही हे उपाय वापरण्याची सवय लावून तुम्ही निरोगी राहू शकता. 

हळदीचं दुध

हळदीच्या दूधाचे अनेक फायदे आहेत. असं म्हटलं जातं की, यामुळे सर्दी, खोकला आणि जखम लगेच भरून निघते. एवढचं नाहीतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.  दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो अशा लोकांनी हळदीच्या दुधाचं सेवन करणं गरजेचं आहे.

सर्दी, खोकला आणि घशात होत असलेल्या खवखवीसाठी हळदीचं दूध उत्तम ठरत असतं. रोज रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीर चांगले राहते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

आलं आणि तुळशीचा चहा

आल्याचा चहा शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे आपलं सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आलं उपयोगी ठरतं. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी, तसेच वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठीही आलं आणि तुळशीचा चहा उपयुक्त ठरतो. 

ताजे आणि गरम अन्नपदार्थ खा

पावसाळ्यात शिळ्या पदार्थांचे सेवन केल्यानं आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. अतिसार, जुलाब, उलट्या, डोकेदुखी, पित्त अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गरम आणि ताजे अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त गरम पाण्याचे सेवन करा. 

गरम पाण्याची वाफ घ्या

सध्या मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्यासोबत लोक स्टिम थेरेपी सुद्धा करत आहेत. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जास्त हिट निर्माण झाल्यामुळे कोरोना जिवंत राहू शकणार नाही. ५ ते २० मिनिटांपर्यंत किंवा जितका जास्तवेळ तुम्ही वाफ घेऊ शकता तितका जास्त वेळ घ्या.  डॉक्टर सर्वसाधारणपणे सर्दी, खोकला झाल्यानंतर वाफ घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे स्टिम नाक आणि गळ्यातील म्युकसला पातळ बनवते. परिणामी श्वास घ्यायला समस्या उद्भवत नाही.

हे पण वाचा-

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Monsoon season gives lot of infection ministry of ayush suggest some home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.