शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

पावसाळ्यात या 4 कारणांमुळे जास्त होतं कानाचं इन्फेक्शन, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:29 IST

Ear infection in Monsoon : कानात इन्फेक्शन वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतं. जे याच्या प्रकारांवर अवलंबून आहे. जसे की, कानाच्या वरच्या भागात होणारं इन्फेक्शन आणि कानाच्या आत होणारं इन्फेक्शन.

Ear infection : पावसाळ्याच्या दिवसात सामान्यपणे फंगल, बॅक्टेरिअल आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. ओलावा असलेल्या या वातावरणात फंगल आणि बॅक्टेरिया सहजपणे वाढतात आणि त्यांना प्रजनन करण्याची संधी मिळते. याला ते मल्टीप्लाय ककरतात आणि सहजपणे पसरतात. अशात शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं. 

का होतं पावसाळ्यात कानात इन्फेक्शन?

कानात इन्फेक्शन वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतं. जे याच्या प्रकारांवर अवलंबून आहे. जसे की, कानाच्या वरच्या भागात होणारं इन्फेक्शन आणि कानाच्या आत होणारं इन्फेक्शन. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे सांगता येतील.

1) पावसात भिजल्या कारणाने - पावसात भिजण्याचा आनंद मिळत असला तर याचे नुकसानही खूप आहेत. ज्यातील एक आहे कानाचं इन्फेक्शन. कानात संक्रमण व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. खासकरून बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इनफ्लुएंजा. हे सामान्यपणे तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या ब्लॉकेजमुळे होतं. ज्यामुळे कानात एक द्रव्य तयार होतं. यूस्टेशियन ट्यूब एक छोटी ट्यूब असते जी तुमच्या कानापासून थेट गळ्यापर्यंत जाते. पावसाळ्यात कानात जेव्हा ओलावा राहतो तेव्हा हे बॅक्टेरिया पसरतात आणि इन्फेक्शनचं कारण ठरतात.

2) साबणाच्या पाण्यामुळे - पावसाळ्यात आधीच सगळीकडे ओलावा असतो. अशात साबणाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. या पाण्यामुळे कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. जे नंतर आतपर्यंत जातं.

3) स्वीमिंगमुळे - पावसाळ्यात स्वीमिंग पूलसारखी ठिकाणं फंगल आणि बॅक्टेरियासाठी प्रजननाची स्थळं असतात. अशात स्वीमिंग पूलच्या पाण्यामुळे तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होऊ शकतं. या इन्फेक्शनमुळे कानात खाज आणि वेदना होऊ शकतात. याने नंतर समस्या वाढते. त्यामुळे पावसाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करणं टाळलं पाहिजे.

4) थंड पदार्थ खाल्ल्यामुळे - थंड पदार्थ खाल्ल्यामुळेही तुम्हाला कानात इन्फेक्शन होऊ शकतं. हे संक्रमण एडीनोइडमधून कानात होतं. तुमचे एडेनोइड तुमच्या नाकाच्या मागे तोंडाच्या आत वरच्या भागातील ग्रंथी आहेत. ज्या तुमच्या शरीराला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. संक्रमण या ग्रंथींमधून तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या आजूबाजूला पसरू शकतं. याने कानात इन्फेक्शन होतं.

काय दिसतात लक्षणं?

- कानात झोपताना वेदना होणे

- झोप न लागणे

- आवाज ऐकणे किंवा प्रतिक्रिया देण्याची समस्या

- संतुलनाची हानी

- ताप

- कानातून द्रव्य पदार्थ निघणे

- डोकेदुखी

या सर्वच कारणांमुळे पावसाळ्यात कानात इन्फेक्शन होतं. अशात तुम्ही या दिवसात आंघोळ करताना कानात कॉटन टाकून ठेवू शकता. पावसात भिजल्यावर कानात पाणी गेल्याचं जाणवत असेल तर वेळीच कान साफ करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य