Monsoon diet tips foods eat and avoid during monsoon that can weaken immunity system | पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

पावसाळयात वातावरणातील बदलांमुळे वेगवेगळे आजार उद्भवतात. कोरोना काळात अशा आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर आजारांपासून लढता येऊ शकतं. पण  खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसच्या सारख्या अनेक आजारांशी लढणं कठीण होतं. त्यासाठी आहार घेताना काही चुका टाळायला हव्यात. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यास कारणीभूत असलेल्या घटकांबाबत माहिती देणार आहोत. 

पालेभाज्या खाताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि चिखल यांमुळे पालेभाज्या फ्रेश मिळतील की नाही याबाबत शंका असते. अनेकदा दुषित पाण्यातील भाज्याचे सेवन केल्याने रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून घरी आणल्यानंतर पालेभाज्या गरम पाण्याने किंवा मीठाच्या पाण्याने चांगल्या धुवून स्वच्छ करा

 तुम्हाला मासाहार आवडत असेल तरी सध्या काही दिवस समुद्रातील मासे खाणं टाळा. कारण  या दिवसात प्रजननाचा काळ असल्यामुळे माश्यांचे सेवन केल्याने वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. जरी मासाहार करत असाल तरी फ्रेश आणि चांगले शिजलेले मास खा. तेलकट पदार्थाचे सेवन करू नका. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये तेलकट पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्यास  पचनक्रिया संथ गतीने होते. 

त्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका.  कच्च्या भाज्या खाणं शक्यतो टाळा. फळांचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुवून मगच खा.पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे  नकळतपणे रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा धोका असतो. 

याशिवाय  जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.  जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. जास्तीत जासत गरम पाणी प्या. गरम पाणी प्यायल्याने जठराग्नी व्यवस्थित राहतो. त्यामुळे आजार उद्भवत नाहीत. गरम पाणी प्यायल्याने इंट्री पॉईंटवर म्हणजेच घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही.

धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

coronavirus: कोरोनाबाधितांच्या वाढीने घेतला चिंताजनक वेग, एकट्या जुलै महिन्यात वाढले ११ लाख रुग्ण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Monsoon diet tips foods eat and avoid during monsoon that can weaken immunity system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.