शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

Military Diet: फक्त ३ दिवसात जबरदस्त वजन कमी करणार मिलिट्री डाइट; जाणून घ्या खास डाएट प्लॅन

By manali.bagul | Updated: February 21, 2021 10:35 IST

Military diet e 3 day diet plan for weight loss : ज्यात तुम्ही एका आठवड्यात  ४.५ किलो वजन कमी करू शकता. या पद्धतीला मिलिट्री डाएटच्या नावानं ओळखलं जातं.

तुम्ही ऐकलंच असेल वजन कमी करायला खूप मेहनत करावी लागते आणि खूप वेळ व्यायाम करून घाम गाळल्यानंतर वजन कमी होतं. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याची एक सोपी ट्रीक सांगणार आहोत. अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून रिजल्ट्स मिळवतात. पण आज आम्ही तुम्हाला डाएटचा असा प्रकार सांगणार आहोत, ज्यात तुम्ही एका आठवड्यात  ४.५ किलो वजन कमी करू शकता. या पद्धतीला मिलिट्री डाएटच्या नावानं ओळखलं जातं.

काय आहे मिलिट्री डाएट?

मिलिट्री डाएट हा प्रकार आहारतज्ज्ञांनी मिळून तयार केला आहे. हे डाएट खासकरून देशाच्या सैनिकांसाठी तयार केलं जातं. जेणेकरून ते कमीत कमी वेळात  जास्त वजन कमी करू शकतील. म्हणूनच या डाएटला मिलिट्री डाएट, नेव्ही डाएट, आर्मी डाएट किंवा आईस्क्रिम डाएट असंसुद्धा म्हटलं जातं. विशेष म्हणजे या डाएट अंतर्गत कोणत्या ही सप्लीमेंट्स आणि  विशेष खाद्य पदार्थांचा समावेश नसतो. यात समाविष्ट असलेल्या वस्तू इतक्या स्वस्त आहेत. त्यामुळे  कोणतीही या वस्तूंचा आधार घेत आपलं वजन कमी करू शकतो.

काय आहे डाएट पॅटर्न?

या वजन कमी करण्यासाठी डाएट हा खूप मह्त्वाचा घटक आहे. म्हणूनच मिलिट्री डाएट खूप वेगळ्या पद्धतीनं डिजाईन करण्यात आला आहे. या अंतर्गत व्यक्तीला आठवड्यातून तीन दिवस कमी कॅलरीज असलेल्या अन्नाचं सेवन करावं लागेल. बाकीच्या चार दिवसात डाएट करावं लागणार नाही.  हाच  डाएट पॅटर्न जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत सुरू ठेवावा लागेल.

डाएटची वैशिष्ट्यै

शरीरातील फॅट्सना जाळण्याचे काम या डाएटद्वारे केले जाते. त्यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येत नाही. चार दिवस जेव्हा तुम्ही डाएट करणार नाही तेव्हा  १३०० ते १५०० कॅलरीज फक्त  घ्याव्या लागतील. याशिवाय प्रोटीन्सचं प्रमाणही पाहावं लागेल. वजन कमी होण्यासाठी शरीरात कार्बोहायड्रेड्सचं कमी प्रमाणात सेवन करायला हवं. जर तुम्ही या डाएटचा अवलंब करत असाल तर  तुम्हाला कोल्ड ड्रिंक, फ्रुटी सारख्या अन्य पेयांना आहारातून वगळावं लागेल. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे लागेल. 

व्यायाम किती करायचा?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही दुसरा कोणताही व्यायाम करत नसाल तर  २० मिनिटं पायी चालणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतं. यामुळे इतर कोणतेही व्याया करण्याची गरज भासणार नाही. वजन कमी करण्याचे काही सिद्धांत असतात. ते म्हणजे शरीरातील कॅलरीजना जास्त प्रमाणात जाळणं. म्हणजेच जर तुम्ही रोज २००० कॅलरीज घेत असाल तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरीजच कमी प्रमाणात घ्याव्या लागतील. Migraine Neck Pain: मायग्रेनच्या दुखण्याने वाढू शकते 'ही' समस्या, अजिबात करू नका दुर्लक्ष....

अशाप्रकारचा डाएट करत असताना तुम्हाला थकवा येणं, कमकुवत वाटणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून डाएट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तीन दिवसीय आहार योजना खूपच विचार करून बनवली आहे. म्हणून याव्यतिरिक्त, अधिक घटक खाणे आपल्या ध्येयावर परिणाम करू शकते. म्हणून आपण खाली देत ​​असलेल्या आहाराचे अनुसरण करा. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

डाएट प्लॅन

पहिला दिवस - ब्रेकफास्ट  - १/२ कप द्राक्षे, १ टोस्ट काप, २ चमचे शेंगदाणा लोणी आणि साखर नसलेली चहा किंवा कॉफी. लंच - १/२ कप मासे, १ टोस्ट स्लाइस, कॉफी किंवा चहा डिनर - कोणत्याही मांसाचे दोन तुकडे, 1 कप हिरव्या बीन्स, १/२ केळी, १ लहान सफरचंद आणि १ कप व्हॅनिला आईस्क्रीम  

दुसरा दिवस - ब्रेकफास्ट - १ अंडे, १ टोस्ट स्लाइस, १/२ केळी लंच - १ कप कॉटेज चीज किंवा १ स्लाइस चेडर चीज, १ उकडलेले अंडे, सॉल्टिन क्रॅकर्स, डिनर - २ हॉट डॉग्स, १ कप ब्रोकोली, १/२ कप गाजर, १/२ केळी आणि १ /  कप व्हॅनिला आईस्क्रीम.

तिसरा दिवस -  ब्रेकफास्ट - ५ सोडा क्रॅकर्स, १ स्लाइस चेडर चीज, एक छोटा सफरचंद लंच - एक उकडलेले अंडे, १ टोस्ट स्लाइस डिनर - १ कप मासे, १/२ केळी, १ कप व्हॅनिला आईस्क्रीम.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स