देशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

By manali.bagul | Published: September 29, 2020 12:52 PM2020-09-29T12:52:10+5:302020-09-29T12:57:35+5:30

महिला आणि पुरूषांच्या वजनांमध्ये बदल घडून आला आहे. याशिवाय उंचीवरही याचा परिणाम झालेला दिसून येतो.

Men and women in the country increased 5-5 kg weight know what about bmi | देशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

देशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Next

दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या बदलांचा सामना आपल्याला नेहमीच करावा लागतो. राहणीमान, आहाराच्या  सवयी नेहमीच बदलत असतात. लॉकडाऊनदरम्यान मोठ्या बदलांचा सामना अनेकांना करावा लागला आहे. महिला आणि पुरूषांच्या वजनांमध्ये बदल घडून आला आहे. याशिवाय उंचीवरही याचा परिणाम झालेला दिसून येतो. एनबीटीच्या एका रिपोर्टनुसार देशात एका दशकाआधी  जे बॉडी मास इंडेक्स होतं त्यात बदल  घडून आला आहे. दहावर्ष आधी महिलांचे वजन ५० किलोग्रॅम होते. तेच वजन आता ५५ किलोग्रॅम झालं आहे. पुरूषांचे वजन  ६० किलोवरून  ६५ किलो झाले आहे. भारतातील महिला आणि पुरूषांच्या वजनात  पाच किलोंनी वाढ झाली आहे. 

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनने दिलेल्या माहितीनुसार भारतीय लोकांचा बॉडी मास इंडेक्स बदलला आहे. म्हणजेच आता  ५५ किलो वजन असलेल्या महिला आणि  ६५ किलो वजन असलेले पुरूष फीट समजले जातील. बीएमआयच्या माध्यमातून शरीराचं वजन आणि उंची किती असावी हे ठरवलं जातं. बीएमआयमध्ये ठरवलेल्या उंची आणि वजनाच्या गुणोत्तरापेक्षा जास्त वजन असल्यास तुम्ही शारीरिकदृष्या निरोगी नाहीत असा त्याचा अर्थ  होतो. फक्त वजनातच नाही तर उंचीतसुद्धा कमालीचा फरक दिसून आला आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशननं दिलेल्या माहितीनुसार उंचीत सुद्धा वाढ झालेली दिसून आली आहे. मागच्या दशकात पुरूषांची उंची  ५ ते ६ फुट होती.  आता भारतीय पुरूषांच्या उंचीत बदल होऊन ५ ते ८ फुटांपर्यंत उंची वाढलेली दिसून येत आहे. महिलांच्या उंचीतही बदल झालेला दिसून येत आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पोषक खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे हा बदल दिसून आला आहे. 

वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करणं असो अथवा वाढवणं असो. या स्थितीत तुम्हाला डाएट खूप महत्वाचं असतं.  त्यासाठी व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असतं. त्यासाठी फळं, ताज्या भाज्या, गरम पाणी, लिंबू यांचा आहारात समावेश करा. रोजच्या कामामुळे वेळेचा अभाव आणि थकवा आल्यामुळे आपली झोप पुर्ण होत नाही. ७ ते ८  तास झोप घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे राहत  असाल तर  तुमचं पोट जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगली झोप घेणं आवश्यक आहे. कारण झोप झाली नाही तर हार्मोनल इंबॅलेन्स होण्याची शक्यता असते.

योगा करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं. रोज पोट कमी करण्यासाठी तुम्ही ठरावीक पद्धतीने योगा कराल कर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.  तुम्हाला जीमला जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. घरच्याघरी मॅट घालून तुम्ही योगा करू शकता. अल्कोहोलचं सेवन केल्यानंतर शरीरातील मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यात मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त या पदार्थाचं सेवन केल्यास  लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे  मादक पदार्थांचे सेवन करू नका. 

साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेटाबॉलिज्म मंद गतीने होतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. इतकंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला गोड खावसं वाटत असेल तर फळांचा आहारात समावेश करा. जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. असे चरबी वाढवणारे पदार्थ टाळा.

Web Title: Men and women in the country increased 5-5 kg weight know what about bmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.