आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:34 PM2021-06-06T15:34:56+5:302021-06-06T15:36:57+5:30

आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत.

The mango is king of fruits; But who should eat... read to know | आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

googlenewsNext

आंबा म्हणजे फळांचा राजा. अनेकजण फक्त आंब्याची चव चाखता यावी म्हणून उन्हाळ्याची वाट बघतात.  आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायेदशीर आहे. आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत.

आंब्याने वजन वाढते का?
आंबा सोडियम आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असतो. त्यामुळे आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही. आंब्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, बी ६, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे फळ बिनधास्त खा.

आंबा त्वचेसाठी फायदेशीर 
आंब्यात अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करतात. तसेच आंबा त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाचे रूग्ण आंबा खाऊ शकतात का?
आंबा हे एक गोड फळ आहे. मात्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे चांगले आहे. म्हणून मधुमेह असलेले लोक दिवसातून एक आंबा खाऊ शकतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आंब्याचे फायदे
1. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
2. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
3. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
4. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

Web Title: The mango is king of fruits; But who should eat... read to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.