सेक्समुळे व्यक्तीने गमावली स्मरणशक्ती, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:29 IST2022-05-27T15:28:12+5:302022-05-27T15:29:38+5:30
आयरलॅंड यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमरिकच्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटने सांगितलं की, या केसवरून हे दिसतं की, सेक्समुळे मेमरी लॉस होऊ शकते.

सेक्समुळे व्यक्तीने गमावली स्मरणशक्ती, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा
सेक्समुळे एका व्यक्तीला शॉर्ट-टर्म मेमीर लॉस झाल्याची अजब घटना समोर आली आहे. तो गेल्या २ दिवसातील सर्व गोष्टी विसरला. हे एका रिसर्चमधून समोर आलं आहे. आयरिश मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार, सेक्सच्या १० मिनिटांनंतर ६६ वर्षीय व्यक्तीला Transient Global Amnesia नावाचा आजार झाला.
आयरलॅंड यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमरिकच्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटने सांगितलं की, या केसवरून हे दिसतं की, सेक्समुळे मेमरी लॉस होऊ शकते. ७ वर्षाआधीही व्यक्तीला सेक्सनंतर मेमरी लॉसची समस्या झाली होती. त्यावेळी Amnesia च्या तक्रारीवरून तो हॉस्पिटलमध्ये गेला होता.
रिपोर्टनुसार, स्मरणशक्ती प्रभावित होण्याच्या १० मिनिटांआधी ही व्यक्ती पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत होती. ज्यानंतर त्याने फोनवर डेट पाहिली आणि अस्वस्थ झाला. त्याला वाटलं की, वेडिंग अॅनिव्हर्सरी त्याने मिस केली. पण याच्या एक दिवसआधीच त्याची वेडिंग अॅनिव्हर्सरी झाली होती.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, व्यक्तीने एक दिवसाआधीच वेडिंग अॅनिव्हर्सरी साजरी केली होती. त्याची जुनी मेमरी ठीक होती. पण त्या दिवशी आणि त्याच्या एक दिवसआधीची कोणतीही आठवण त्याच्याकडे नव्हती.
अभ्यासक Transient Global Amnesia ला जुन्या आजारासोबत जोडून बघत आहेत. त्यांचं मत आहे की, ५० ते ७० वयोगटातील व्यक्तीसोबत असं होतं.
डॉक्टरांनुसार, Transient Global Amnesia ला मायग्रेन, फिजिकल एक्सरसाइज, हॉट-कोल्ड वॉटर, इमोशनल स्ट्रेस, पेन आणि सेक्शुअल इंटरकोर्ससोबत जोडलं जातं. सामान्यपणे ५० ते ६० वयोगटातील लोक याने प्रभावित होता. असं मानलं जातं की, जास्तीत जास्त रूग्णांसोबत अशा घटना नेहमी होतात.