Maharashtra Corona Update : काळजी वाढली! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा धोका; मागच्या २४ तासात समोर आली हादरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 12:01 PM2021-03-04T12:01:33+5:302021-03-04T12:12:51+5:30

Maharashtra Corona Update & Latest News : गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ९ हजार ८५५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाढलेल्या संख्येमुळे  लोकांची झोप उडाली आहे.

Maharashtra Corona Update: Today about ten thousand new corona cases found in maharashtra | Maharashtra Corona Update : काळजी वाढली! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा धोका; मागच्या २४ तासात समोर आली हादरवणारी आकडेवारी

Maharashtra Corona Update : काळजी वाढली! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा धोका; मागच्या २४ तासात समोर आली हादरवणारी आकडेवारी

Next

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचा (CoronaVirus )धोका वाढत आहे. हीच बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने आता मास्क न घालणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टेंसिंग पाळत नसलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. तरिही कोरोना व्हायरस नियंत्रणात येत नाहीये असं दिसून येत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ९ हजार ८५५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाढलेल्या संख्येमुळे  लोकांची झोप उडाली आहे.

महाराष्ट्रात आज  ९ हजार ८५५  कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे ४२ लोकांना मृत्यू सामना करावा लागला आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा २.४०  टक्के आहे. राज्यात ६ हजार ५५९ कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. यामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३.७७ आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये ८२, ३४३ एक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नागपुरात वाढतोय कोरोनाचा धोका

नागपुर (Nagpur Corona Cases) शहरात कोरोनाच्या केसेसमध्ये कमतरता आढळली असून  गेल्या २४ तासात १ हजार १५२ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर ६ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. शहरात आतापर्यंत ४ हजार ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  नागपूर शहरात एकूण रुग्णांची संख्या  ९ हजार २९५ आहे. सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा

पुण्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

पुण्यात  कोरोना रुग्णांमध्ये(Pune corona Cases)  कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळपास १ हजार ७१४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनानं जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केलं असून सरकारनं या गोष्टींना गांभीर्यानं घेतलं आहे. २९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

Web Title: Maharashtra Corona Update: Today about ten thousand new corona cases found in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.