शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

ही लक्षणे दिसल्यास त्वरित व्हा सावध! असू शकतात फुफ्फुसाच्या 'या' गंभीर आजाराचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 3:31 PM

फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा धोका असतो. फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते.

आपल्यापैकी अनेकजण आरोग्याच्या समस्या गंभीर होत नाहीत तोवर त्याकडे दुर्लक्ष करतात. फुफ्फुसाच्या आजारांच्या बाबतीतही अनेकदा असे होते. फुफ्फुस हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याद्वारे रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम होते. परंतु बहुतेक लोकांना फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत माहिती नसते. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा धोका असतो.

पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी IndianExpress.com मधील बातमीत म्हटले आहे की, फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे (वॉर्निंग सायन्स) जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

छातीत दुखणेअचानक छातीत दुखण्याचा त्रास महिनाभर सतत जाणवत असेल किंवा त्याहून अधिक काळ टिकत असेल - विशेषत: श्वास घेताना किंवा खोकताना तीव्र दुखत असल्यास हे फुफ्फुसातील बिघाडाचे लक्षण आहे.

जास्त श्लेष्माश्लेष्मा, ज्याला कफ देखील म्हणतात. त्याचा जाड थर फुफ्फुसाच्या आत खोलवर उत्सर्जित होतो. तोंडाच्या किंवा घशाच्या आतील पातळ थुंकी नव्हे. श्लेष्मा रोगग्रस्त फुफ्फुस, पवननलिका आणि वरच्या श्वसनमार्गामध्ये हवेच्या हालचालीशी संबंधित आहे. जर तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ श्लेष्मासह खोकला असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते.

अचानक वजन कमी होणेपोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, जर कोणत्याही आहार योजना किंवा व्यायामाशिवाय तुमच्या वजनात लक्षणीय घट होत असेल तर तुमच्या शरीरात आत एक ट्यूमर वाढत असल्याची लक्षणे आहेत.

श्वासोच्छवासात बदलजर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते. फुफ्फुसातील ट्यूमर किंवा कार्सिनोमामधून द्रव जमा झाल्यामुळे हवेचा मार्ग अवरोधित होतो, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो.

रक्तासह सतत खोकलाआठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ खोकल्यातून रक्त येणे हे एक जुनाट आणि महत्त्वाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते, जे तुमच्या श्वसन प्रणालीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे दर्शवते. पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवा. त्यांना हलक्यात घेऊ नका आणि भविष्यात समस्या टाळण्यासाठी या गोष्टी तपासणे केव्हाही चांगले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स