व्यायाम करायला वेळ नाहीये, मग या उपायांनी करा वजन कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:13 IST2019-11-22T12:53:19+5:302019-11-22T13:13:33+5:30
सध्याच्या काळात आपला फिटनेस मेंन्टेन ठेवण्यासाठी बरेच उद्योग महिला करत असतात.

व्यायाम करायला वेळ नाहीये, मग या उपायांनी करा वजन कमी
(image credit -forbes)
सध्याच्या काळात आपला फिटनेस मेंन्टेन ठेवण्यासाठी बरेच उद्योग महिला करत असतात. अनेकदा वाढलेल्या शरीरामुळे हवे तसे कपडे घालता येत नाहीत. बदलत्या जीवन शैलीत वजन कमी करणे. सोपी गोष्ट नाही. वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत. ज्यांचा सेवनाने वजन नियंत्रणात ठेवता येतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास वजन कमी होईल .
१) गाजराचे भरपूर सेवन करावे. कारण शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच गाजर खाल्ल्याने रक्त वाढते. तर गजराचे आरोग्यला ही फायदे होतात. गाजरामध्ये खनिज ग्लायकोकॉलेट, जीवनसत्त्वे आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते आणि हे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात आढळणारे लाल गाजर हे जीवनसत्वे आणि पोषण समृद्ध मानले जाते. गाजरात खनिजे फार मोठ्या प्रमाणात असतात.
२) पपई नियमित खा. पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच पपई खाल्ल्याने गॅससंबंधित तक्रार दूर होते. इतकेच नाही तर पपई पचन तंत्राला दुरुस्त ठेवते. त्यामुळे पपई वजन कमी करण्यासाठी रोज खायला हवी.
३) दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले दही किंवा एक ग्लास ताक प्यावे.
४) वजन कमी करण्यासाठी जिरं हा रामबाण उपाय आहे. एक चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास, वेगाने तुमचं वजन कमी होतं. एका संशोधनातून वजन कमी करण्यासाठी जिरं महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध झालं आहे. हे केवळ जास्त कॅलरीच बर्न करत नाही तर, मेटाबॉलिजमचा रेट वाढवून पचनक्रियादेखील सुधारते.
(imagecredit-stylecraze)
५) व्हाईट ब्रेड, केक बिस्किट, खारी, सारखे बेकरी पदार्थ मैद्यापासूनच बनतात. मैदा पचायला जड असतो. मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. तुम्हाला फरक जाणवू लागेल. फायबर काढलेले प्रोसेस्ड फूड्स, बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड्स बाजारात सहज उपलब्ध होतात. या पदार्थांचा वापर जाणिवपूर्वक टाळा.